प्रा. आरोग्य केंद्र किनगावला कर्मयोगी मधुकर दादा मुंढे यांचे नाव देण्यात यावे : बाळू आमले शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर (दादा) गंगारामजी मुंढे साहेब असे नाव देण्यात यावे
अहमदपूर तालुक्यातील किनगाव प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म रा यांना निवेदन देण्यात आले आहे की,किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर (दादा) गंगारामजी मुंढे साहेब असे नाव देण्यात यावे असे तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अहमदपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले आहे .कै मधुकर दादा यांनी किनगाव सरपंच पदावर असताना आनेक गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे अपंगांचे कैवारी होते .त्यांनी आपल्या स्वताच्या मालकीची जमीन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,बस स्टँड, पशुवैद्यकीय दवाखाना,जि प शाळा, आपल्या जमीनी शासनाला दान केल्या त्याचे कारयाने त्यांनी किनगाव चे नाव महाराष्ट्र भर गाजविले. आजही त्यांचे नाव किनगाव येथील जनतेच्या तोंडात आहे त्यांनी शिवसेनेत राहुन सरपंच पदापासून ते जिल्हा अध्यक्ष पर्यंत जाऊन सामाजिक कार्य केले.सरपंच पदावर असताना त्यांनी गावांमध्ये रस्ते ,शाळा, दवाखाना,दलीत वस्ती,पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी किनगाव मध्ये एक स्वतंत्र वस्ती बांधुन त्या वस्तीला कै केशव सितारामजी ठाकरे नगर असे नाव देण्यात आले गरिब जनतेला राहण्यासाठी आसरा दिला.मा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव कर्मयोगी कै मधुकर दादा गंगारामजी मुंढे असे नाव देण्यात यावे अशी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव व समस्त गावकरी यांच्या उपस्थित बाळू आमले(किनगाव शहराध्यक्ष), योगेश आमले(शाखाध्यक्ष)मोहसिन शेख(उपाध्यक्ष) दशरथ हैगले(सचिव)एजाज पठाण(कोषाध्यक्ष),प्रकाश जोशी(कार्याध्यक्ष) इम्रान पठाण, गणेश श्रृंगारे,वैजनाथ चाकाटे,, रामेश्वर चिखलबिडे कोराळे गोरख, बालाजी पांचाळ,गणेश बोडके,अक्षय क्षिरसागर, गडकरी हनुमंत,सोमनाथ स्वामी, भंडारे भिमा, पांचाळ सतिश, , सतिश ठाकुर, दिनेश किनकर,शेळके ओम,सावता श्रृंगारे, कृष्णा शेळके, आंधळे गोविंद, किशोर हंगे, सिध्देश्वर सुरेश आदिजण उपस्थित होते समस्त गावकरी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीन निवेदन देण्यात आले
टिप्पण्या