शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाविरोधात स्वाक्षरी मोहीम
शेतकरी व कामगार विधेयका विरुध्द स्वाक्षरी मोहीम.
विष्णु हरण प्रातिनिधि आखाडा बाळापूर दि.20 ऑक्टोंबर
आज आखाडा बाळापूर मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मजूर व शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्यावे यासाठी स्वाक्षरी मोहीम जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने राबविण्यात आली.
हे विधेयक म्हणजे शेतकरी आणि मजूर यांना देशोधडीला लावण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचे मत हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय पाटील बोंढारे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित काँग्रेस नेते जक्की कुरेशी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष धनंजय पाटील सूर्यवंशी, मा.सरपंच अभय पाटील सावंत , जी. प. सदस्य भगवान खंदारे, सभापती दत्ता पाटील बोंढारे, शाहबाझ कुरेशी ,पांडुरंग बोंढारे,राहुल पतोडे , शेतकरी , व कामगार उपस्थित होते.
टिप्पण्या