तथागत बुद्ध विहार किनगाव येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथवाचनाचा समारोप
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा किनगावत समारोप
भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावच्या वतीने आज अश्र्विन पोर्णिमे निमित्त तथागत बुद्ध विहार किनगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म व मिलिंद प्रश्र्न या ग्रंथाचा समारोप झाला.यावेळी तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमीचे पुजन ललिता तातेराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आयु धम्मानंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हा सचिव लातुर करूणा धम्मानंद कांबळे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले कोरोना प्रादुर्भावामुळे आषाढ पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमे पर्यंत बौद्ध उपासक-उपासिका यांनी घरोघरी ग्रंथाचे पटण केले,त्याची सांगता आज दिनांक 31आक्टोबर वार शनिवार यादिवशी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळुन करण्यात आले त्रिशरण पंचशील पुजापाठ आयु करुणा धम्मानंद कांबळे व आयु सुषमा श्रीमंत कांबळे यांनी घेतले यावेळी पोर्णिमेचे महत्व करुणा धम्मानंद कांबळे व भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावचे अध्यक्ष आयु श्रीमंत कांबळे सर यांनी सांगितले, पोर्णिमे निमित्त तथागत बुद्ध विहारा मध्ये आयु ललिता तातेराव कांबळे यांनी दान स्वरूपात घड्याळ दिले, तसेच या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या ललिता कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अहमदपूर तालुका सचिव अंकुश वाहूळे,नरहरी गायकवाड टि.टि. वाहुळे सर, बालाजी कांबळे संतराम कांबळे संचालक सोसायटी, सतीश वाहुळे,विजय कांबळे त्रिशरण वाघमारे संभाजी कांबळे,आर.के.कांबळे, बाबू कांबळे कुमार भगत, वैजनाथ गायकवाड माधव गायकवाड योगेश लांडगे विक्रांत वाहुळे, वाहुळे, प्रीतम कांबळे,विधान वाहुळे, अनिल वाहुळे,व महिला उपासिका भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य आयु संगीता बालाजी कांबळे, आशाबाई दशरथ कांबळे, रेणुका देविदास वाहुळे, पंचशीला त्रिशरण वाघमारे, वैशाखी कांबळे मयुरी कांबळे हे उपस्थित होते
टिप्पण्या