गंगाखेड परभणी रोडवर भिषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

गंगाखेड परभणी रोडवर भिषण अपघात , दुचाकीस्वार जागीच ठार

गौतम मुजमुले
परभणी प्रतिनिधी

दि. ७ गंगाखेड : गंगाखेड परभणी रोडवरील महातपुरी फाट्याजवळ दहाचाकी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात , यात दुचाकीस्वार अनिल सोपान बडे वय 32 यांचा जागीच मृत्यु झाला आहे
   याबाबत सविस्तर वृत्त असे की , सध्या गंगाखेड परभणी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरु असल्याने रस्ता खोदल्याने रस्त्यावर धुळ सारखी उडत असते तसेच बारीक दगड गोट्यांवरून दुचाकी निसटुन किंवा मातीत घसरत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . परंतु कोणताही वाहनचालक जिवीताची पर्वा करताना दिसत नाही . याचीच प्रचिती म्हणुन की काय आज येथीत महातपुरी फाट्याजवळ एक दुचाकी ट्रक क्र Mp 13 DA O457 या दहाचाकी ट्रकला जाऊन धडकली ज्यात दुचाकी स्वाराचा डोक्याला जबरी मार लागुन जागीच अंत झाला . मयत दुचाकीस्वाराचे नाव अनिल बडे आहे . घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व उत्तरीय तपासनीसाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे पाठवण्यात आले . पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे