पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्यासाठी लढा उभारणार : प्रा. नागोराव पांचाळ

पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण व निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लढा उभारणार - प्रा.नागोराव पांचाळ.
अहमदपुर 

वंचित बहुजन अाघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा.नागोराव पांचाळ यांना पदवीधर युवकांचा प्रतिसाद मराठवाड्यात वाढत असल्याचे चिञ दिसत अाहे.
    अहमदपुर येथे प्रचारानिमीत्त वंचितचे उमेदवार प्रा नागोराव पांचाळ व सम्यक विद्यार्थी अंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाशभाई इंगळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात अाली. यावेळी प्रा नागोराव पांचाळ मतदारांना संबोधित करताना वंचीतची भुमीका मांडताना त्यांनी अनेक प्रश्नावर प्रकाश टाकत मतदारांना विविध समस्यांना सभागृहात वाचा फोडण्याचे अश्वासन दिले. कंञाटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणे,जुनी पेन्शन,शिक्षकांच्या मुलांसाठी फ्री शिप ,स्कुल पोर्टलचा प्रश्न,महाज्योती तात्काळ निधी उपलब्धता सी एस बी प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याचे अाश्वासन प्रा नागोराव पांचाळ यांनी मतदारांना दिले.
सम्यक विद्यार्थी अंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे यांनी यापुर्वीचे पदवीधर अामदार हे निक्रीय असुन त्यांनी सभागृहात कुठल्याच समस्यांना वाचा फोडली नसल्याचे अापल्या भाषणात मांडले. यावेळी वंचित बहुजन अाघाडी अहमदपुर चे पदाधिकारी
प्रा.सुनिल दहीकांबळे,
ञिशरण वाघमारे,
सहदेव होनाळे ,
प्रल्हाद ढवळे,राहुल तलवार,संजय माकेगावकर,बाबासाहेब वाघमारे,विनोद नामपल्ले,विनय ढवळे,सारिपुञ ढवळे,राम कांबळे,शाम कांबळे,सचिन बानाटे व अन्य पदवीधर मतदार यावेळी उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे