संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे

संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे

मुंबई : सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे. या तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा युथ पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष मा. भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
                     महाराष्ट्र तसे इत्तर राज्यामध्ये बेरोजगारी बरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत चालले आहे. असंख्य गुन्हे दिवसेनदिवस घडत आहेत. जातीय अत्याचाराची मालीका थांबतां थांबत नाही. युवा वर्ग कळत नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. ह्या देशाचे भवितव्य लक्षात घेता कायद्याचा अभ्यास मुलांच्या मनावर बिंबवने अत्यंत महत्वाचे आहे. 
           संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी संविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा. यासाठी सर्व सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षानी सरकारकडे हा आग्रह धरण्याचे आव्हान भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे.
                    हे देशभरातील वाढत असलेले अन्याय अत्याचार लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातून यावर निवेदन स्वरूपात सादर करून सरकारचे लक्ष केंद्रीत करून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडू.
                            युथ पॅंथर सोशल मुव्हमेंट च्या माध्यमातून आम्ही संविधान जनजागृती करून 26 नोव्हेंबर संविधान दिवसाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी व संविधान दिवस कसा साजरा करावा यासाठी एक उद्देशीका निर्माण करावी. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार कडे तगादा लावणार असल्याची प्रतिक्रिया युथ पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष मा. भाऊसाहेब कांबळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे