वंचित बहुजन आघाडीचे महावितरणच्या कार्यालया वर अर्धनग्न आंदोलन

लॉकडाऊनच्या काळातील लाईट बिलात 100% सुट देण्यात यावी यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे आंदोलन नैसर्गीक आपत्तीच्या काळात जनतेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य असते परंतु सरकार काळजी घेत असल्याचे भासवुन फुकट राशन वाटप करून खुप केल्याचा आव आणत आहे. जनतेच्या इतर गोष्टी जसे वीज ,पाणी , रोजगार या गोष्टींकडे सरकार डोळेझाक करत आहे. लॉक डाऊनच्या काळात सामान्य लोकांच्या हाताला काम नसल्याने सामान्यांचे विज बिल माफ करण्यात यावे व इथुन पुढे लागु करण्यात येणाऱ्या बिलामधे पहिला टप्पा २०० युनिट चा करण्यात यावा. सदोष मिटर त्वरीत बदलण्यात यावेत. सर्व व्यावसाईक , व्यापारी वर्गाचे व्यवसाय सुरळीत हाईपर्यंत विज बिलात 50% सुट देण्यात यावी या संबंधीचे निवेदन विभागीय अभियंता लातुर यांना अर्धनग्ण आंदोलन करत वंचीत बहुजन आघाडी लातुर च्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोषभैया सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे . जिल्हा महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे , अमोल लोडगे , विशाल वाहुळे , नितीन गायकवाड , विशाल गायकवाड , माने रमेश आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत देण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे