ध्येयवेडे आबेडकरी विचार वाहक मा. नरसिंह घोडके यांचा ऱ्हदय सत्कार
नरसिंग घोडके नावाच्या
ध्येय वेड्या आंबेडकरी विचाराच्या
वाहकाचा हृदय सत्कार.
...............................................
नरसिंग मरेप्पा घोडके गव्हाणकर हे नाव महाराष्ट्रातील लहू, फुले, शाहू, डॉ बाबासाहेब, अण्णा भाऊंचे वैचारिक वारसदार असणाऱ्यांना चांगले परिचयाचे आहे.
ग्रामीण भागात जन्म घेऊन 29 वर्ष शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करीत असताना दलित, अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या मांग समाजात फुले, शाहू आंबेडकरी विचार रुजावा, मांग समाज विद्यार्जनात पारंगत व्हावा, समाज साभिमानी बनावा यासाठी प्रामाणिक काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून नरसिंग घोडके सर लोकांना परिचयाचे आहेत. एक बहुजन चेहरा म्हणून ते तितकेच प्रिय आहेत.
समाज आर्थिक दृट्या श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने श्रीमंत होणे त्यांना गरजेचे वाटते. आयुष्याची 40 वर्ष फुले, शाहू, आंबेडकरी विचाराची शिदोरी समाजाला वाटण्याचे मोठे काम घोडके सरांनी केले हे शोषित समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. त्याची पोच पावती म्हणजे त्याचा मोठा चाहता वर्ग.
दलित पँथर, आणि समाजवादी विचाराचे नेते स्वामी अग्निवेश यांच्या विचारातुन घडलेला हा साभिमानी कार्यकता. नात मानलेलं असो वा रक्ताचं मदतीच्या वेळी जे आधार देत तेच खरं नातं हा सिद्धांत चूक आहे.
" जे नातं माणसाचं आयुष्य बदलवित तेच खरं नातं ते आमचं अनमोल नातं आहे त्याचं नाव
आंबेडकरी
नातं.
घोडके सर सेवानिव्रुत्त झाल्या नंतर प्रथमच चळवळीचे केंद्र असलेल्या उदगीर शहरात आले असता त्याचा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हृदय सत्कार केला. तो जातीचा नव्हे विचाराचा म्हणून. हा सत्कार विचाराने विचारला मुजरा करावयास लावला.
सरांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
माणसाची गर्दी नको विचाराची दर्दी माणसं समाज बदलू पाहतात तो काळ आमची वाट पाहतोय असेच म्हणावे लागेल. क्रांती अभिप्रेत असणारा समाज जन्म घेण्यासाठी समाजाला क्रांती घडविणाऱ्या कार्यकर्त्यास जन्म द्यावा लागतो. क्रांती बलिदान मागते मग त्या बलिदानाचे स्वरूप कोणतेही असो त्यासाठी कार्यकर्ते तय्यार असावे लागतात ती फौज फक्त विचाराची डोके करू शकतात यावर आमचा विश्वास आहे. त्यातील एक कार्यकर्ता म्हणजे नरसिंग घोडके सर. या सत्कार प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती प्रा. संजय भाऊ दोरवे, प्रा शिवाजीराव देवनाळे, मा साळुंके सर, मा बालाजी कांबळे, प्रा गोविंद भालेराव, प्रा मारोती कसाब, शिवाजी गोटमुकलें, लातूर जिल्हा म स बँकेचे शाखा प्रमुख आनंद राजे गोतमुकलें, भारतकुमार गायकवाड, प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.
.........
टिप्पण्या