भारतीय बौद्ध महासभा तालुका रेणापूर कार्यकारीनीची पानगाव येथे बैठक
*भारतीय बौद्ध महासभा रेणापूर तालुका कार्यकारिणीची पानगाव येथे बैठक*
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी साठी पानगाव तालुका रेणापुर येथे रेणापुर तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. *प्रमुख मार्गदर्शक म्हणून किनगाव शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य श्रीमंत कांबळे गुरुजी यांनी धम्म संस्थेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.* प्रमुख उपस्थिती अंकुश वाहुळे गुरुजी अहमदपूर तालुका सरचिटणीस. या बैठकीचे अध्यक्ष रेणापुर तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग बौद्धाचार्य संतोष चिकटे होते. तर बैठकीचे प्रास्ताविक रेणापूर तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य आयु. संतराम चिकटे गुरुजी यांनी केले. यावेळी तालुका कोषाध्यक्ष सुग्रीव कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग बालाजी कांबळे सारोळा, खलंग्री ग्रामशाखेचे अध्यक्ष दयानंद चिकटे, सहदेव सूर्यवंशी सय्यदपुर, तालुका उपाध्यक्ष महिला विभाग आयुनी. बालिकाताई चिकटे, तालुका सचिव महिला विभाग सुजाताताई कांबळे गोढाळा, तालुका सचिव महिला विभाग अन्नपूर्णाताई जोगदंड, तालुका सचिव संरक्षण विभाग नागनाथ सरवदे, तालुका सचिव प्रचार व पर्यटन विभाग राजाराम जोगदंड कारेपूर, स. न. चिकटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.
1. महापरिनिर्वाण दिनी चैत्य स्मारक पानगाव येथे अन्नदान करणे
2. धम्म संस्थेचे धम्मयान दिनदर्शिका तालुक्यातील सर्व उपासक-उपासिका पर्यंत पोहोचवणे.
3. महापरिनिर्वाण दिनी सदस्य नोंदणी मोहीम राबवणे.
4. रेणापुर तालुक्यामध्ये प्रत्येक गावत धम्म संस्थेची शाखा स्थापन करणे
5. रेणापुर तालुका कार्यकारिणीचे व ग्राम शाखेचे कार्यकर्ता (Kedar Camp) प्रशिक्षण शिबीर घेणे
तालुकाध्यक्ष आयु. संतराम चिकटे यांनी आभार मानले. सरणतय गाथेने सांगता झाली.
टिप्पण्या