लातुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

*लातूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना*
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल जिल्हा शाखा लातूर च्या वतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे सकाळी 9.00 वा. 3 अधिकारी व 35 सैनिक यांच्यावतीने *मानवंदना देण्यात आली* व धम्म संस्थेच्यावतीने सूत्र पठण घेण्यात आले. 
पंचशील बुद्ध विहार न्यू भाग्यनगर लातूर येथे 10.00 वाजता समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली
मुलगंध कुटी बुद्धविहार सुभेदार रामजी नगर लातूर येथे 10.30 वाजता समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी जनार्धन लामतुरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले आणि *जनार्धन लामतुरे यांच्यावतीने समता सैनिक दल साठी पाच गणवेश देण्याचे मान्य केले*
म्हाडा कॉलनी बाभळगाव रोड येथे 11.00 वा. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
*महिला मंडळाच्या वतीने समता सैनिक दल साठी एक गणवेश देण्याचे मान्य करण्यात आले.*
 यावेळी केंद्रीय शिक्षक आशाताई चिकटे, लातूर जिल्हाध्यक्ष तथा जिओसी प्रा. बापूसाहेब गायकवाड जिल्हा सरचिटणीस तथा जॉईंट जिओसी अर्जुन कांबळे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाराम साबळे, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, डिव्हिजन ऑफिसर तथा जिल्हाप्रमुख समता सैनिक दल विकास दंतराव जिल्हा सचिव अभिमन्यू लामतुरे, जिल्हा सचिव नानासाहेब आवाड, लातूर जिल्हा सचिव महिला विभाग मंगलताई सुरवसे, लातूर शहराध्यक्ष कुंदन गायकवाड, शहर उपाध्यक्ष महिला विभाग रेखाताई घोबाळे शहर सचिव रेखाताई सुरवसे, शहर उपाध्यक्ष समता सैनिक दल विलास गायकवाड, सचिव अजय गायकवाड, शहर सरचिटणीस प्रा. निलेश कांबळे शहर कोषाध्यक्ष बिभीषण ढगे, उपाध्यक्ष बिभीषण माने, तालुका सरचिटणीस प्रा. जीवन गायकवाड. ता. कोषाध्यक्ष राजाभाऊ उबाळे, उपाध्यक्ष देवराव जोगदंडे, समता सैनिक दल तालुका सचिव पवन कांबळे सेलूकर, तालुका सचिव प्रेमनाथ कांबळे, तालुका संघटक आनंद दोणेराव, संघटक संजय गायकवाड, उत्तम कांबळे, अशोक शिंदे, विशाल कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे