"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे"
"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे"
प्रो.डॉ.वाल्मिक सरवदे सरांचा वाढदिवस...त्यानिमीत्ताने.
● प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे यांचा जन्म 1 जानेवारी 1966 रोजी, बीड जिल्हातील केज तालुक्यात, केज - कळंब या रोड वर सावळेश्वर पैठण या छोट्याश्या गावी झाला. आई-वडील एक मोठा भाऊ व बहीण असे पाच सदस्य या छोट्याश्या गावी राहायचे.त्यांचे वडील विहीर खोदण्याचे काम करायचे तर मोठा भाऊ दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते.सरवदे सर दीड वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली.सरांच्या कुटुंबाने हे सर्व दुःख पचवून परिस्थितीला झुंज देऊन मावशी सुमित्रा यांनी आईची जागा घेऊन वडील व मोठा भाऊ उत्तम यांनी त्यांचा सांभाळ करून शिकवले. असे म्हणतात संघर्षाशिवाय पर्याय नाही, या वाक्याप्रमाणे त्यांनी शाळेत शिकत असताना आपली गावची शाळा मंदिरात भरायची आणि त्या मंदिरात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना बसण्याची परवानगी सुद्धा नव्हती. पण हा सर्व अस्पृश्यतेचा त्रास सहन करत-करत सरांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यानी आपले हायस्कूलचे शिक्षण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणारे बनसारोळा या गावी समाज कल्याणच्या वस्तीगृहात राहून पूर्ण केले. पुढे अकरावी ते पदवी पर्यंत चे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई या महाविद्यालयामध्ये वाणिज्य या विषयात त्यांनी पूर्ण केले. अंबाजोगाई या ठिकाणी शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रा. एस. के जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होऊन दलित युवक आघाडी नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असतानाच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सरानी आपला संघर्ष सुरू ठेवला. नंतर आपले पदव्युत्तर शिक्षण (एम. कॉम. ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी पूर्ण करून वाणिज्य या विषयात सेट-नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली. सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या पाच ते सहा संध्या चालून आल्या. पण सरानी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद याठिकाणी एप्रिल 1990 साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या ठिकाणीच सर न थांबता अवघ्या सात ते आठ वर्षानंतर आपल्या अथांग परिश्रमाने, मेहनतीने,गुणवत्तेच्या व ज्ञानाच्या जोरावर जुलै 1998 यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सर सध्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयाचे अधिष्ठाता (डीन) म्हणून कार्यरत आहेत.
याच बरोबर विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या पदावर सरानी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. उदा. डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स, हेड ऑफ कॉमर्स डिपारमेंट, डीन ऑफ द फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बी.सी.यू.डी. डायरेक्टर, डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट वेल्फेअर, परीक्षा नियंत्रक, कॉर्डिनेटर फोर एम बी ए कोर्स, इन्चार्ज कॉम्प्युटर सेंटर अशा अनेक न मोजता येणाऱ्या विद्यापीठाच्या कमिटीवर त्यानी कार्य केलेले आहे. शैक्षणिक बाबतीत विचार केला तर सरांनी मायनर आणि मेजर असे मिळून आठ ते दहा प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. आज पर्यंत त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचे 250 पेपर पेक्षा अधिक प्रकाशित झालेले आहेत. आजपर्यंत वाल्मिक सरवदे सरांची 13 पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. ते नॅशनल व इंटरनॅशनल या ठिकाणी शैक्षणिक कमिटीमध्ये अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्य करत आहात. आजपर्यंत अनेक नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्स, सेमिनार आणि वर्कशॉप आयोजित केलेले आहेत. 8 नॅशनल व इंटरनॅशनल जर्नलचे एडीटोरियल बोर्ड चे मेंबरही सर आहेत. आज पर्यंत पीएचडीचे 35 विद्यार्थी व एम.फिल चे 49 विद्यार्थ्यांना संशोधनाचे मार्गदर्शन सरांनी केले आहे. तसेच एमबीएच्या 760 विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे गाईडन्स केलेले आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणून आज पर्यंत 25 देशांना अभ्यासाच्या व संशोधनाच्या कार्यासाठी प्रोफेसर वाल्मिक सरवदे सरांनी भेटी दिलेल्या आहेत. प्रोफेसर वाल्मीक सरवदे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, बेस्ट रिसर्च अवार्ड, विद्यापीठाचे कुशल प्रशासक, बेस्ट अकॅडमी ऍडमिनिस्ट्रेशन, नॅशनल व इंटरनॅशनल असे अगणित न मोजता येणारे पुरस्कार डॉक्टर वाल्मीक सरोदे सरांना भेटलेले आहेत. आजपर्यंत सर्व पदे स्वतःच्या ज्ञानाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेली आहेत,यात काही शंका नाही.
सामाजिक बाजूने सांगायचे झाले तर आपण कित्येक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अडी-अडचणीत मदत केलेली आम्ही सर्वानी पहिली आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर सरानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य महासचिव हे पद चांगल्या पद्धतीने पूर्ण करून अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे आणि विद्यार्थ्याना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व त्यांना न्याय देण्यासाठी सतत संघर्ष केलाआहे. संघर्षाची बाजू मांडताना सरवदे सरांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आदरणीय सर प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यावेळपासून तर आज पर्यंत इथल्या जातीव्यवस्था मानणाऱ्या व प्रस्थापितांच्या विरोधात आपला संघर्ष सुरू ठेवला आहे. कोणताही प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वतःच्या अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून आपला संघर्ष नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
आदरणीय प्रोफेसर डॉ.वाल्मिक सरवदे सरांबद्दल सारांश स्वरूपात बोलायचे झाले तर, संघर्षाची सुरुवात करत असताना भारत देशातील विषमतावादी व्यवस्थेला छेद देऊन समता प्रस्थापित करणारे महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विसर पडणे शक्य नाही. कारण यांच्या संघर्षाची ख्याती सर्वदूर पसरलेली व समानता प्रस्थापित करण्यासाठी या महापुरुषांनी केलेला संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराचे सच्चे अनुयायी आहेत यात काही शंका नाही. म्हणून असे म्हणता येईल, संघर्षातून स्वतःची वाट निर्माण करणारे, स्पष्टवक्ते, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक समस्या वेळोवेळी सोडवणारे, वाणिज्य विषयातील तज्ञ मार्गदर्शक, गुरुवर्य आदरणीय प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे सर आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपली शैक्षणिक व सामाजिक कार्याची वाटचाल यापुढे अशीच सुरू राहील, यात काही शंका नाही. आपल्या पावलावर पाऊल टाकून आमच्या सारखी येणारी नवी पिढी वाटचाल करेल व आपण केलेले शैक्षणिक कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल,यात कसलाही संदेह नाही
-प्रा. डॉ.धम्मपाल घुंबरे
कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर (कासार) ता. शिरूर कासार
जि. बीडबीड जिल्हाध्यक्ष
टिप्पण्या