पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागणार्‍या इसमावर गुन्हा दाखल

पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागणार्‍या इसमावर गुन्हा दाखल
    चाकूर प्रतिनिधी: चाकूर येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावरून पपन कांबळे हे घरगुती कामानिमित्त चाकूर येथील बाजारामधे सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गाडीवर जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांची गाडी थांबवली आणि तुझ्याकडे किती पैसे आहेत ते पैसे मला दे अशी मागणी करू लागला. पण पपण कांबळे यांनी त्याला जाब विचारला असता आपला कसलाही व्यवहार नसताना तू पैसे कशाचे मागतो आहेस म्हणून विचारले असता त्या ईसमाने खिशातील पिस्तूल काढून माझ्या कानपट्टीला लावले आणि मी घाबरून गेलो पण मला कांही सुधरनासे झाले. तो म्हणाला पैसे दे नाहीतर तुला खतम करतो म्हणून जोरजोराने धमकावू लागला पण हा सारा प्रकार बघून पपण कांबळे यांचे काही मित्र त्या ठिकाणी आले आणि काय झाले ,काय झाले म्हणता म्हणता त्याच्याकडिल पिस्तूल हे खेळणीतले असल्याचे चर्चिले जात होते तेवढयात त्या ठिकाणाहून त्याआरोपीने तिथून पळ काढला . पण त्या ठीकणी त्याच्या नावाची चौकशी केली असता त्या आरोपीचे नाव मंगेश उस्तूर्गे असल्याचे समजले आणि त्यांच्या विरोधात चाकुर पोलीस स्टेशन येथे रीतसर 384 ,341, 506 या प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे