बच्चु कडु यांच्या तब्येतीसाठी पिर गैबी बाबास चादर अर्पण करून साकडे
प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अपंग ह्रदय सम्राट लोकनायक शेतकऱ्यांचा कैवारी मा.ना.बच्चु भाऊ कडू हे तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले असता भाऊ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किनगाव शहरातील सुप्रसिद्ध हजरत पिर गैबी बाबा दर्गेला चादर चढविण्यात आली. प्रमुख उपस्थिती शहर अध्यक्ष बाळू आमले,शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, बबलू कुरेशी,वैभव कल्याणे, बालाजी पांचाळ इतर प्रहार पदाधिकारी उपस्थित होते