पारधवाडी येथे आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
दिनांक 18/02/2021 रोजी माननीय श्री जि. ए. कोरेवाड, तालुका कृषी अधिकारी सोनपेठ यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पारधवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथे आत्मा अंतर्गत जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दुग्धव्यवसाय व्यवस्थापन या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दिनकर तिथे, जिल्हा परिषद सदस्य उखळी, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री के आर सराफ साहेब प्रकल्प उपसंचालक आत्मा, परभणी , मार्गदर्शक श्री डॉ. मार्कंडेय सर सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी , श्री डॉ रिंढे, सहा. प्रा. प.वै.म.वि.परभणी श्री डॉ चेपटे सहा. प्रा. प.वै.म.वि.परभणी तसेच क्रषि पर्यवेक्षक श्री डि बी नागरगोजे, क्रषि सहाय्यक श्री पि आर उपाध्ये, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री योगेश पतंगे हे लाभले. कार्यक्रमास पारधवाडी, लोकरवाडी, उखळी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावना श्री योगेश पतंगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सोनपेठ यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ. रिंढे यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती महत्व व पद्धती या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री डॉ चेपटे यांनी दुधाळ जनावरांचे आरोग्य सांभाळने व आजार लसीकरण या बाबत माहिती दिली.
डॉ मार्कंडेय यांनी पशुधन निवड, चारा व्यवस्थापन, विक्री व्यवस्था, मुक्त गोठा पद्धती चे महत्व या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मा श्री के आर सराफ यांनी आत्मा अंतर्गत विस्तार कार्यक्रमाअंतर्गत प्रात्यक्षिके, शेतिशाळा, गांडूळखत निर्मिती,सेंद्रिय कर्ब ई. विषया बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष श्री तिथे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व उपस्थित मार्गदर्शक व आयोजकांचे आभार मानले.
श्री नागरगोजे यांनी उपस्थितांचे व मार्गदर्शकांचे आभार मानले.
तद्नंतर सर्वांनी भोजनाचा लाभ घेतला व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा जिजाऊ शेतकरी गटातील सदस्य , शेतकरी मित्र श्री हनुमंत फड व पारधवाडी येथील शेतकरी बांधवांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या