नीतिमान माणूस घडवण्यासाठी धम्म शिबिराची आवश्यकता आहे. -केंद्रीय शिक्षक एम. एम.
*नीतिमान माणूस घडवण्यासाठी धम्म शिबिराची आवश्यकता आहे.* -केंद्रीय शिक्षक एम. एम. बलांडे
भारतीय बौद्ध महासभा लातूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने *रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचशील बुद्ध विहार न्यू भाग्य नगर लातूर येथे दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन* केंद्रीय शिक्षक एम. एम. बलांडे गुरुजी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, "धम्म शिबिरातून माणूस नीतिमान होतो. आणि धम्म गतिमान होतो." धम्म गतिमान होणे म्हणजे संपूर्ण मानव जात सुखी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धम्म शिबिरामध्ये सहभागी होणे अत्यावश्यक आहे. या धम्म शिबिरामध्ये न्यू भाग्य नगर लातूर येथील 25 उपासिका सहभागी झाल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीताताई भालेराव (लातूर तालुका सचिव) या होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड यांनी केले.
कविताताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग प्रमुख तथा केंद्रीय शिक्षिका यांनी
*धम्म शिबिराची आवश्यकता या विषयावर* सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई चिकटे केंद्रीय शिक्षिका, मेजर जनरल राजाराम साबळे जिल्हा कोषाध्यक्ष, हिराचंद गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष , मंगलताई सुरवसे जिल्हा सचिव महिला विभाग, रेखाताई सुरवसे शहर सचिव महिला विभाग, शोभाताई माने लातूर तालुका सचिव महिला विभाग, अशोक शिंदे सर, विलास आल्टे जिल्हा उपाध्यक्ष, बोध्दाचार्य आचार्य देवदत्त बनसोडे जिल्हा सचिव, बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले जिल्हा सचिव, अभिमन्यू लामतूरे जिल्हा सचिव, बौद्धाचार्य हनमंत कांबळे कार्यालयीन सचिव, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहराध्यक्ष कुंदन गायकवाड तर आभार शहर उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग बिभीषण माने यांनी मांडले. शहर उपाध्यक्ष वसंत टेंकाळे, शहर संघटक राजेंद्र हजारे, तालुका कोषाध्यक्ष राजाभाऊ उबाळे, तालुका संघटक दीपक कांबळे आदींनी या कार्यक्रमाला परीश्रम दिले. लातूर शहरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप सरणत्तय गाथेने करण्यात आला.
टिप्पण्या