सय्यदपुर ( बु. ) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा.
भाजपाच्या 30 वर्षाच्या भ्रष्ट व फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागून सय्यदपुर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील बुड्डे यांच्यावर अविश्वास ठराव पास करण्यात आला व काल दि. 28/6/2021 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपसरपंच पदाचे उमेदवार नरसिंग नामदेव चींतलवाड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळवला व त्यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी उपस्थित नवनिर्वाचित उपसरपंच नरसिंग चींतलवाड, ग्रामपंचायत सदस्य भावी सरपंच करण जगन्नाथ कांबळे, छायाबाई बबन कांबळे, विद्या गोरख चींतलवाड यांचा वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका महासचिव सचिन सुर्यवंशी, प्रसिध्द वैद्यराज आनंदराव राजेमाने, स्वस्त धान्य दुकानदार चेअरमन आजीतकुमार चप्पे, गावचे प्रतिष्ठीत नागरिक व सर्वांच्या मदतीला धावून येणारे नागेशजी कुलकर्णी, युवा भीम सेनेचे तालुका सचिव मुकुंद सुर्यवंशी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रतन पिंटलवाड, वैजनाथ चींतलवाड, सत्यवान सुर्यवंशी, गोरख बोईनवाड, काशिनाथ चींतलवाड, विश्वनाथ सुर्यवंशी, सोपान भोपळे पांडुरंग चींतलवाड, व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या