घनसोली येथे छ.शाहु महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी
* घणसोलीत राजर्षी शाहू महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी.* दि.२६ जून २०२१ रोजी बुद्धघोष विहार सेक्टर 4, घणसोली, नवी मुंबई. येथे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज तथा यशवंत आबासाहेब घाडगे यांची 147 वी जयंती कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम पालन करून अगदी साध्या पद्धतीने सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आरक्षणाची गरज व त्याची निर्मिती लोकहित कल्याणकारी कशी आहे आणि आजच्या आधुनिक युगातही आरक्षणासाठी आजच्या पिढीला लढा द्यावा लागतो त्यामुळे त्याची चिकित्सा, चिंतन करण्याची गरज समाजाला आजही तितकीच महत्त्वाची आहे यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपले आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य डी.एस. सूर्यवंशी यांनी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी शाहू महाराजांना पुष्पगुच्छ अर्पित करून करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांचा जीवनपट सांगताना विचारवंत, लेखक प्राध्यापक मा.दत्ता हेगडे यांनी आपल्या प्रभावशाली शैलीतून उपस्थितांना मार्गदर्शन करताना १९०२ साली हंटर कमिशन समोर आरक्षणाचे प्रावधान मंजूर करून घेतले असता अभयंकर नावाच्या वकिलाने शूद्रांना आरक्षण कशाकरिता हवे आहे? हे समजावताना त्यास घोड्यांच्या तबेल्यात नेऊन सर्व घोड्यांना एकाच वेळी चारा देण्यास सांगितले असता सशक्त घोड्यांनी प्रथम त्यावर ताव मारला व मरतुकड्या घोड्यांना चारा खाता येईना व खाण्यास पुढे जात असल्यास घोड्यांच्या लाथा खाव्या लागल्या हीच परिस्थिती सध्या शूद्रांची आहे असे प्रत्यक्ष कृतिशील उदाहरणातून समजावले अशा एकोणिसाव्या शतकात शिक्षण घेऊन एम. ए.पदवीधर झालेल्या कल्याणकारी राजाने कोल्हापूर येथे राधानगरी धरण बांधत असताना स्वतःची इस्टेट गहाण ठेवली भविष्यात कोल्हापुरास सधन जिल्हा म्हणून जगद्विख्यात ख्याती मिळाली. गंगाराम नावाच्या शुद जातीच्या इसमास शाहू महाराजांनी चहाचे दुकान थाटून दिले असता जातीवादी लोक त्याच्याकडे चहा पिण्यास देत नसत म्हणून महाराज स्वतः आपल्या बग्गीतून त्याच्या स्टॉलवर चहा पिण्यास येत असत व इतरांना चहा पिण्यास प्रवृत्त करीत जेणेकरून जातिवाद्यांना यातून धडा शिकवता येईल व समता प्रस्थापित होईल महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यात तेली, माळी, कोळी, मराठा, महार, मांग, ढोर, जैन, मुस्लिम अशा अनेक जातीच्या मुलांना शिक्षण घेत असताना वसतिगृहे काढून दिली म्हणून वसतिगृहांच्या जिल्हा म्हणून कोल्हापूर नावाजला गेला या खेरीज कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे 2 नेते बहुजन समाजाला दिले पुढे चालून कर्मवीरांनी 810 महाविद्यालयाची निर्मिती केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 38 महाविद्यालयाची निर्मिती करून देशाची राज्यघटना लिहिली. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेतून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे पुरोगामी विचारांचे नेते तयार झाले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ज्या घरातील मुले शिकणार नाहीत अशा कुटुंबाला एक रुपये दंड असा फतवा काढणारे आता होणे शक्य नाही. या सारखे अनेक उदाहरणे देऊन प्रा. हेगडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बसपा प्रभारी नवी मुंबई जिल्हा मा. राजेश जयस्वाल, ज्येष्ठनेते विचारवंत कवी जे.के. पोळ, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा लोकसभा प्रभारी मा. महेंद्र पवार, राष्ट्रीय मूलनिवासी संघटक (बामसेफ) मा.संजय माळी, रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंंबई सचीीीीव रमेेश बोदडे(आठवले गट )वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई संघटक मा. गौतम शीलवंत, संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष नवी मुंबई मा. दीपक पहुरकर, बहुजन मुक्ती पार्टी चे नेते विजय मोकल, रिपब्लिकन सेना नवी मुंबई युवा अध्यक्ष सुनील वानखेडे, ऑल इंडिया पॅंथर सेना, नवी मुंबई उपाध्यक्ष मा. शुद्धोधन मोहोड, ज्येष्ठ नेते मा.घईन कांबळे, पत्रकार चंद्रकांत अवघडे, सत्यशोधक मैत्री संघ नेते अविनाश कोरडे, शेकाप नेते संतलाल शर्मा यांच्यासह बुद्धघोष बुद्ध विहारकमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार, समालोचक मा. सुनील गायकवाड यांनी केले यावेळी उपस्थितांना अल्पोपहाराची ही सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन पत्रकार अनंतराज गायकवाड यांनी केले.
टिप्पण्या