IDFC FIRST Bharat ltd कडुन गरजुंना किराणा किट वाटप.
अंबाजोगाई ः IDFC FIRST Bharat ltd हे अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती , शाळेला स्मार्टबोर्ड देणे इत्यादी सामाजीक कार्यक्रम नेहमी राबवतात. तसेच आत्ता सुरु असलेल्या कोरोणा काळामध्ये लोकांना काम नसल्यामुळे आणि पैसा नसल्यामुळे उपासमार झाली. त्यासाठी IDFC FIRST Bharat ltd. कडून सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक शाखे मार्फत त्या त्या ठीकाणी कोरोना झालेल्या कुटुंबासाठी त्या खातेदारांना IDFC तर्फे किराणा किट चे वाटप करण्यात आले. कोरोना ची लाट ही महाभयंकर होती. अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. अनेक लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. असल्या कोरोना च्या काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा. IDFC चे ब्रिद वाक्य आहे *ग्राहक नेहमी पहीला* त्या प्रमाणे ग्राहकाची काळजी घेतली जाते. आपला ग्रहक उपाशी कोणी राहू नये याचाच विचार करून IDFC शाखा अंबाजोगाई च्या वतीने कोरोना झालेल्या अनेक रुग्ण खातेदारांना मोफत किराणा किट देऊन सहकार्य केले.
यावेळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.गव्हाणे, IDFC कडील श्री शरद देडे (समाज विकास विभाग प्रमुख महाराष्ट्र) , शाखेचे व्यवस्थापक श्री.किरण देवरे, तसेच शाखेतील सर्व कर्मचारी आणि किराणा किट लाभार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या