शिक्षण उपचार न राहता जिवनशैलीचा भाग बनलं पाहिजे - गणेश दादा हाके
शिक्षण उपचार न रहाता जीवन शैलीचा भाग बनला पाहिजे - गणेश हाके
आज औपचारिक शिक्षणावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिक्षण उपचाराचा भाग बनत चालला आहे. शिक्षण केवळ उपचार न रहात तो विध्यार्त्यांच्या जीवन शैलीचा भाग बनला पाहिजे असे मत श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व भाजपा चे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी येथे सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने आयोजित पालक मेळाव्यात व्यक्त केले. या वेळी श्री हाके यांनी चंद्रगुप्त सारख्या गुराख्याच्या मुलाला आर्य चाणक्य सारख्या गुरु कडून मिळालेल्या उत्तम शिक्षणा मुळे तो अखंड भारताचा पहिला सम्राट बनू शकला. उत्तम शिक्षण मिळालेतर गोर गरीब शेतकऱ्यांची शेत मजुरांची मुलं हि आज कलेक्टर, एस पी बनतील आज भौतिक सुविधांच्या नावा खाली अनेक शाळा चालक पालकांची लूट करत आहेत. केवळ सुविधा म्हणजे शिक्षण न समजता पालकांनीहि उत्तम शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे असेहि श्री हाके यांनी सांगितले.
या वेळी बोलताना सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल चे संचालक श्री कुलदीप हाके यांनी जगातील व देशातील विविध शिक्षण पद्धती व शाळांचा अभ्यास करून उत्तमातले उत्तम शिक्षण शेतकरी व गोर गरिबांना परवडणाऱ्या शुल्कात देण्याच्या उदात्त हेतू ने सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल सुरू केले असून या द्वारे अहमदपूर ला शिक्षण पंढरीचे गत वैभव पुन्हा प्राप्त करून देण्या साठी आम्ही मिशन म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.
या वेळी उपस्थित पालक श्री वारलवाड माधव यांनी आपली मते मांडली व शाळेचा शिक्षणाचा एक भाग म्हणून संस्थेच्या सर्व उपक्रमात सहभागी होवून सहकार्य करू असे सांगितले.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य रूथ चक्रनारायण यांनी केले तर आभार संचालिका प्रा. शिवालीका हाके यांनी मानले .
या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव , प्राचार्य रेखाताई तरडे, हेमंत गुट्टे, सुरेश दादा हाके पाटील, प्राचार्य नितीन शिवपुजे ,.परमेश्वर पाटील, लक्ष्मण पाटील, धोंडीराम पोळ, बालाजी पारेकर अजय भालेराव, रोडगे मॅडम
हे मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या