आय डी एफ सी फर्स्ट भारत लि. कडुन गरजु ग्राहकांना किराणा किट वाटप
आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड कडुन प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेतून समाजातील दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी मदत करत आली आहे. अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती सामाजीक उपक्रम नेहमी राबवतात. शाळा व महाविद्यालये यांना स्मार्ट बोर्ड वाटप ,कोरोणामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे.हाताला काम नसल्यामुळे आणि पैसा नसल्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार झाली आहे. याची गरज ओळखून आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड कडून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखे मार्फत खाते धारकांच्या कुटुंबियांना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये अनेक लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. या काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा व फुल नाही पण फुलाची पाकळी या भावनेतून आज आय डी एफ सी शाखा अंबाजोगाई च्या वतीने खातेदारांना किराणा किट वाटप करण्यात आली.
यावेळी आय डी एफ सीचे समाज विकास विभाग प्रमुख- महाराष्ट्र श्री शरद देडे, शाखा व्यवस्थापक श्री किरण देवरे आणि शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या