शिवसैनिकांनी गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करावे. जिल्हाप्रमुख रेड्डी
शिवसैनिकांनी गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करावे. जिल्हाप्रमुख रेड्डी.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे ,मराठवाडा संपर्क प्रमुख खा. मा.श्री चंद्रकांत खैरे, मराठवाडा समन्वयक शिवसेना नेते विश्वनाथ नेरूरकर , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून किनगाव जिल्हापरिषद गटातील सर्कल निहाय बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन करताना शिवसैनिकांनी अंगातील मरगळ झटकून गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेऊन,गोरगरीब जनतेसाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी ,शासन दरबारी गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कार्याची माहिती जनतेसमोर मांडा,ठाकरे सरकार जनतेला मोफत वैद्यकीय सेवा,मोफत धान्य वाटप,मोफत शीवभोजन थाळी वाटप करण्याचे अतिशय महत्वाचे काम करीत आहे. त्याच प्रकारे कोरोना काळात ऑक्सीजन गॅस,लस उपलब्ध करून देणे,अश्या अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यशस्वी करत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी देशात एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे.त्याचीही माहिती जनतेला सांगा,जनतेची सेवा करा.कुठली अडचण आल्यास तुमचा भाऊ जिल्हाप्रमुख म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर साथ देईन असे ही रेड्डी यांनी सांगितले.
बैठकीस तालुका प्रमुख विलास पवार हांगरगेकर, तालुका संघटक सुधाकर जायभाये,माजी तालुका संघटक अनिकेत फुलारी,उप तालुका प्रमुख गणेश पांचाळ,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले उपस्थित होते.तर बैठकीस विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,उप विभाग प्रमुख बस्वराज शीलगिरे, किनगाव शहर प्रमुख श्रीकांत मुंढे, शाखा प्रमुख सूनेवाड विश्वनाथ,किशोर सानप,देवानंद दहिफळे,गोविंद गुट्टे,अनंत फड,ज्ञानेश्वर कासले,वसंत सारुळे,नागनाथ चींचुलावर,दत्ता कदम,किनगाव शहर कार्यालय प्रमुख विजय सोळंके,परमेश्वर विगवे,अमोल वाघमारे,सह किनगाव पंचायत समिती सर्कल चे सर्व शाखा प्रमुख बूथ प्रमुख आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या