औसा चे उपजिल्हा रुग्णालय होण्याआधीच श्रेय लाटण्याची चढाओढ
औसा
तालुका प्रतिनिधी विलास तपासे
औसा हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यात 126 गावे असलेला मोठा तालुका आहे औसा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर व्हावे अशी अनेक दिवसापासून येथील जनतेची मागणी आहे औसा शहरातून नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 जातो या राष्ट्रीय द्रुतगती मार्गामुळे रस्त्यावर सतत अपघात घडतात अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीची सेवा देण्यासाठी औसा ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही येथे रुग्ण आल्यानंतर प्रत्येक रुग्णांना लातूरला पाठवण्याचा सल्ला दिला जातो औसा तालुक्यातील नागरिकांनी मागील अनेक दिवसापासून औसा शहरात ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करावे अशी मागणी केली परंतु राजकीय नेत्यांनी आश्वासने देऊनही अद्याप ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले नाही दोन दिवसापूर्वी औसा शहरात उपजिल्हा रुग्णालयासाठी हिरवा कंदील अशा प्रकारच्या बातम्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिल्या आहेत परंतु औसा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय नेमके कधी होणार याबाबत शास्वत माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी औसा येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी केली आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे आ. अभिमन्यू पवार यांनीही राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस नेते औसा शहरात उपजिल्हा रुग्णालय होण्यापूर्वीच श्रेय घेण्याचे चढाओढ करताना दिसत आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असून प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी खरे प्रयत्न कोणाचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे
टिप्पण्या