अखेर स नं 4 चे अतिक्रमण कायम करण्यास मंजूरी.!सामूहिक प्रयत्नाला आले यश.!!पन्नास वर्षापासूनचा प्रश्न मार्गी..!!!
अहमदपूर शहरातील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण अखेर आज कायम करण्यास शिक्कामोर्तब झाले असून आता लवकरच लाभार्थ्यांना सदरील जागेचा हक्काचा कबालनामा मिळणार आहे. शहरातील स.नं.4 ही शासकीय जागा असून गेल्या पन्नास वर्षापासून सदरील जागेवर नागरीकांनी रहीवासासाठी अतिक्रमण केले होते.या ठिकाणी नागरीकांना नागरी सुविधा पुरविण्यात येत होत्या मात्र जागेची मालकी नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूला पासून ते वंचित होते. या संदर्भात सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नगर पालिकेने रितसर प्रस्ताव दिला होता.राज्याच्या नगररचनाकार व मूल्यनिर्धारण विभागाच्या संचालकांनी अतिक्रमण नियमानूकूल करण्यास कांही अटी व शर्तीनूसार मंजूरी दिली होती. त्या नूसार उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक आज संपन्न झाली.मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर,उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदपूर यांनी प्रस्तावाची छाननी करून या प्रस्तावास अखेर आपली मंजूरी दिली असल्याने या भागातील गोरगरीब लोकांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.तसेच गेल्या पन्नास वर्षापासूनचा हा प्रश्न कायमपणे सुटला आहे. गेल्...