पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मतदारसंघाचा विकास करणार


 आमदार बाबासाहेब  पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर दि.14/11/21 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचा  नियोजनपूर्वक पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते दिनांक 14 रोजी न्यू शॉपिंग सेंटर येथे एक कोटी 66 लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे ,शिवसेना तालुका प्रमुख विलास पवार, नगरपरिषदेचे कार्यकारी उपाध्यक्ष अँड अमित रेड्डी, बाजार समितीचे संचालक भारत सांगवीकर,श्याम देवकते, जि.प. सदस्य माधव जाधव,न.प.चे गटनेते डॉ.फुजेल जहागिरदार, पाणीपुरवठा सभापती अनुराधा नलेगावकर, आरोग्य व स्वच्छता सभापती संदीप चौधरी, नियोजन सभापती सय्यद सय्यदलाल, नगरसेवक तथा कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत कासनाळे, कार्यकारी नगरसेवक बालाजी आगलावे, नगरसेवक रवि महाजन,नगरसेवक अभय मिरकले, डॉ.अमृत चिवडे, डॉ. बालाजी साळुंखे डॉ ऋषिकेश पाटील,   ज्येष्ठ नागरिक गणेश गुळवे, जिल्हा परिषद चे शिक्षण सदस्य नंदकुमार कोनाले सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले की अहमदपूर नगरपरिषद मोठी असून प्रथम रस्ते, नाल्या ,पाणी आणि दिवाबत्ती यांच्यासाठी अग्रक्रमाने निधी देणार असल्याचे सांगून मी काम करत असताना पक्ष,जात पाहत नाही फक्त काम पाहतो. प्रगती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे, स्वच्छता राखणे, नियमित टॅक्स भरणे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर यांची सेवा करता आली.आणि मतदार संघात मोठमोठे उद्योग उभारण्यासाठी मदत झाल्याचे सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे म्हणाल्या की, शहराचा सर्वागीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून सर्व प्रभागाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येत असून या मिनी बायपास रोड साठी सर्व नगरसेवकांनी व आमदार साहेबांची भरीव मदत केल्यामुळे हे रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे सांगितले. शहरातील पाण्याचा प्रश्न, पेन्शन भवन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, स्वच्छता, एल इ डी लाईट आणि बसवेश्वर पुतळ्यास मान्यता अशी विविध विकासात्मक काम सकारात्मकपणे केल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक अभय मिरकले, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी सभापती, शिवानंद हिंगणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली प्रास्ताविक नगर परिषदेचे कार्यकारी उपाध्यक्ष एडवोकेट अमित रेड्डी यांनी  सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे यांनी केले तर आभार कार्यकारी नगरसेवक बालाजी आगलावे यांनी मानले. यावेळी न्यू शॉपिंग सेंटर च्या वतीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांचा, नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, ठेकेदार शिवराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू शॉपिंग सेंटरचे अध्यक्ष अडवोकेट स्वप्नील व्हत्ते, रमाकांत नागठाणे, श्रीहरी कोटलवार, गजानन भुसारे, प्रकाश बेल्लाळे,  रंगनाथ भुतडा, तुकाराम साबणे, दिलीप गादेवार सह कॉलनी वासियांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे