अखेर स नं 4 चे अतिक्रमण कायम करण्यास मंजूरी.!सामूहिक प्रयत्नाला आले यश.!!पन्नास वर्षापासूनचा प्रश्न मार्गी..!!!



अहमदपूर शहरातील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण अखेर आज कायम करण्यास शिक्कामोर्तब झाले असून आता लवकरच लाभार्थ्यांना सदरील जागेचा हक्काचा कबालनामा मिळणार आहे.

शहरातील स.नं.4 ही शासकीय जागा असून गेल्या पन्नास वर्षापासून सदरील जागेवर नागरीकांनी रहीवासासाठी अतिक्रमण केले होते.या ठिकाणी नागरीकांना नागरी सुविधा पुरविण्यात येत होत्या मात्र जागेची मालकी नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूला पासून ते वंचित होते.
या संदर्भात सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नगर पालिकेने रितसर प्रस्ताव दिला होता.राज्याच्या नगररचनाकार व मूल्यनिर्धारण विभागाच्या संचालकांनी अतिक्रमण नियमानूकूल करण्यास कांही अटी व शर्तीनूसार मंजूरी दिली होती.
त्या नूसार उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक आज संपन्न झाली.मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर,उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदपूर यांनी प्रस्तावाची छाननी करून या प्रस्तावास अखेर आपली मंजूरी दिली असल्याने या भागातील गोरगरीब लोकांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.तसेच गेल्या पन्नास वर्षापासूनचा हा प्रश्न कायमपणे सुटला आहे.

गेल्या पन्नास वर्षापासून विविध पक्ष संघटना,नेते कार्यकर्ते यांनी कबालनामे देण्याच्या साठी वारंवार पाठपूरावा केला होता.मात्र हा प्रश्न सुटला नव्हता.संचालक नगररचना यांनी मंजूरी देवून सूध्दा हा प्रश्न लालफितीत अडकला होता.म्हणून या प्रश्नी प्रभागातील नागरिकांना सोबत घेवून नूकतेच धरणे व निदर्शने अंदोलन सूध्दा करण्यात आले होते.त्यावेळी पूढील महिन्याभरात हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द प्रशासनाने दिला होता हे विशेष.

आज येथील प्रभागातील लाभार्थ्यांच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी प्रवीण फूलारी,मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांची भेट घेवून यास मंजूरी दिल्याबद्दल शाल-पुष्पहार देवून आभार व्यक्त केले.

या प्रसंगी पंचायत समितीचे कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,गफारखान पठाण,शेख रहीमभाई शेखूभाई,शेख जब्बार,शेख सत्तारभाई,मतीन शेख,जकीभाई पिंजारी,पठाण मोहम्मद,शेख नजमाबी,शेख दिलदारभाई,सय्यद नौशाद,शेख मजहरभाई ,वाघमारे नंदू,शेख जाफर,पठाण महेबूब आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे