स्वा रा ती म मध्येे महिलेला चाकूचा धाक, आशिया खंडात अबाधित राहील का रुग्णालयाच नाक
(प्रसेनजित आचार्य , अंबेजोगाई):
आशिया खंडात नाव लौकिक मिळालेले अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दिवसेंदिवस असुविधांचे व समस्यांचे माहेरघर बनत चालले असून येथील अक्षरशः सिझेरियन झालेल्या महिला रुग्णाला चाकूचा धाक दाखवत धमकवण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ज्या बद्दल सविस्तर माहिती अशी की सदरील सिझेरियन महिला रुग्ण डिलिव्हरी वॉर्ड च्या वरच्या मजल्यावर अर्थात जिथे नवजात शिशुंना उपचारासाठी ठेवण्यात येतं तिथे होती. तिथे आजूबाजूला असणारे प्रसाधन गृह कुलूप बंद असल्याने व इतर वॉर्ड मध्ये ही प्रसाधन गृह वापरण्यास त्या वॉर्डातील कर्मचारी प्रतिबंध करत असल्यामुळे दोन मजले पायऱ्या उतरून या महिला बाहेर उघड्यावर मूत्रविसर्जनास गेल्या असता त्यापैकी एका महिलेला चाकूचा धाक दाखवत धमकवण्याचा प्रसंग या महिलेवर बेतल्यामुळे सदर प्रकाराने स्वारातीम च्या नावलौकिकाच नाक कापले आहे,,,
सर्जिकल इमारत चकाचक बांधून झाली परंतु आजवर ही इथे असलेली सामान्य प्रसाधन गृहे मात्र कुलुपबंदच ठेवण्यात आलीत,,,वॉर्डातील प्रसाधन गृहांमधे कधी कधी पाणी देखील नसतं,,, मेडिसिन इमारतीचे तर प्रसाधन गृह कधी स्वच्छ होतातच की नाही याचीही कल्पना नाही,,,
सुरक्षा रक्षकांची फौज आहे मात्र जणूकाय फक्त रुग्णांना अरेरावी करन्यासाठी वापरल्या जाते,,,
*हे मात्र दररोज फेरफटका मारणाऱ्या अधिष्ठाता खैरे किंवा अधीक्षक राकेश जाधव यांना दिसतच नसावे,,,*
डिलिव्हरी साठी येणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना कोणत्याही वेळी वेगवेगळे फॉर्म देऊन दहा-दहा झेरॉक्स काढून आणायला पाठवलं जातं,,,
अधिष्ठाता खैरे यांना संपर्क साधत विचारणा केली तर *' मी डॉक्टरांशी बोललोय बाबा '* म्हणून जाब विचारणाऱ्याचा 'बाबा' केल्या जातो,,,
माध्यमांना सामोरे जायला मात्र कोणीही धजावत नाही,,,फक्त टोलवाटोलवी केली जाते,,,
धोक्यात आलेली प्रतिष्ठा आणि भूतकाळात इथे मिळणाऱ्या सोयीसुविधा अंबेजोगाई च्या या स्वारातीम ला परत मिळवून देण्यात अधिष्ठाता खैरे सपशेल अपयशी ठरतांना दिसत आहेत,,,
परंतु यावर वेळेतच उपाययोजना करणार की रामभरोसे सोडणार हे मात्र पाहण्यासारखं असेल,,,तूर्तास एवढंच...
टिप्पण्या