शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 22 विद्यार्थी. शिष्यवृत्तीधारकराज्याच्या गुणवत्ता यादीत आठवीची आर्या देशमुख.

शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवीची आर्या देशमुख

अहमदपूर दि.09.01.22 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने माहे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थी तर पाचवी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत 07 विद्यार्थी असे एकूण 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यशाची नेत्रदीपक परंपरा कायम केली आहे. 
 त्यात आठवी वर्गाचे आर्या मोहनराव देशमुख-258 गुण घेऊन राज्याच्या यादीत 24वी, जिल्हा यादीत 2री व तालुक्यातून प्रथम,
सृष्टी शिवशंकर पाटील-240 गुण घेऊन जिल्ह्यातून 8 वी, गुट्टे किरण मारुती-230 जिल्ह्यातून 17वा , हेमनर सुरज संदीप-228 गुण घेऊन जिल्ह्यातून अठरावा, जोशी अभिषेक मकरंद राव-222 गुण, इप्पर अंकिता राजेंद्र-216, केंद्रे अनिकेत संतोषराव-214 , गुरमे ज्ञानेश्वर ईश्वर-206, भाळे संध्याराणी मुंजारी-204, केंद्रे स्नेहा संजय-196 ,नागरगोजे अंजली शिवराज-194 ,पवार वेदांत नामदेव-190,डोंगरे सौख्या अभिजीत-190 , मुळे प्रतिभा गोविंद-190 , कांबळे आदित्‍य उत्तम-186 ,
इयत्ता पाचवी चे 7 विद्यार्थी त्यात 
     ईप्पर साईनाथ-242 गुण ,
 फड वैष्णवी-234 ,
 सांगलीकर सुमित-216 ,
शिंदे योगिंदर-194 ,
 नागरगोजे वर्धन-194 ,
 हंगरगे सतीश-188 ,
 पागे अभिनव-184 ,
8वी चे
मार्गदर्शक तथा
विभागप्रमुख गुरप़ा बावगे , राजकुमार बोराळकर , सुदर्शन फुलमंटे , महेश वाघमारे , हनुमंत सुडे , श्रीमती एम बी देशमुख, श्रीमती पी जी सोलपुरे यांचे तर
5वी चे
मार्गदर्शक तथा
विभाग प्रमुख के डी बिराजदार, संतोष पारशेट्टे , विजय वाडकर, बी एन कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.       

        या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी,मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले उपमुख्याध्यापक आर व्ही कोंडलवाडे,पर्यवेक्षक यु व्ही नरडेले ,दिलीप गुळवे सहशिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Thanks a lot and congratulations to all my cleverer with future of India

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे