यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेना विनम्र अभिवादन. "स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले " मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन.

यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेना विनम्र अभिवादन
  स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले
   मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन
      अहमदपूर दिनांक 3.1 .2022 सबंध देशातील महिलांना हिम्मत व संरक्षण देऊन त्यांना शिक्षण देण्याच महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं म्हणून त्या स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांनी केले.
    ते दिनांक 3 रोजी यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अभिवादन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना श्रीयुत गंपले म्हणाले की स्त्री ची परिवारातील, समाजातील भूमिका अत्यंत महत्त्वाची व दिशादर्शक आहे त्यामुळे सर्वच स्तरावर महिलांचा व मुलींच्या सन्मान करा असे सांगितले.
     प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक व महिला शिक्षकांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक रामलिंग तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन वर्षा माळी यांनी तर आभार मधुबाला आंधळे यांनी मानले यावेळी पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, महिला शिक्षिका नागमणी हाळे, प्रतिभा सोलपुरे, मेघा देशमुख सह शाळेच्या मुली व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचा समारोप क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रेरणा गीताने करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे