अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंती निमित्त सेवानिवृत्त महिला शिक्षकांचा सत्कार
अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंती निमित्त सेवानिवृत्त महिला शिक्षकांचा सत्कार ..
अहमदपुर:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयहिंद प्रयाग प्राथ.व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. दरवर्षी यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायाञेचे आयोजन करण्यात येते पण मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी वेगळ्या पध्दतीने जिजामाता ज्ञानप्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षण क्षेञात उल्लेखनिय कार्य करुन सेवानिवृत झालेल्या सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई मोरे व जि.प.प्रा.शाळा सलगरा अंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडीत सेवा करुन सेवानिवृत झालेल्या श्रीमती प्रभावती ग्यानोबा कोडगीरे या दोन्ही महिलांचा शाल श्रीफळ साडीचोळी व सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव पुष्पाताई कोडगिरे व प्रमुख पाहुणे शिवराज माने,बालासाहेब मोरे,सेवानिवृत मुख्याध्यापक धनराज पाटील हे होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत माने यांनी केले सुञसंचालन मनोज कदम व आभार माधव रोंगे यांनी मांडले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..
टिप्पण्या