श्रीराम फायनान्स कंपनी' कडून ग्राहकाची फसवणूक..?

'श्रीराम फायनान्स कंपनी' कडून ग्राहकाची फसवणूक..?
सिरसाळा(प्रतिनिधी):- 2019 मध्ये लिलावात घेतलेल्या ट्रक बाबतीत फसवणूक झाल्याची तक्रार करत 'श्रीराम फायनान्स' विरोधात दिलीप सातपुते यांनी लेखी तक्रार सिरसाळा पोलिसात दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 2019 मध्ये मुंबई येथे झालेल्या एका लिलावात दिलीप सातपुते यांनी एक १२ टायर गाडी १४ लक्ष रुपयांना लिलावात ठरवली. श्रीराम फायनान्स कं. ली. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रोख पाच लाख रुपये जमा हि केले व उर्वरित रक्कम रुपये नऊ लाख गाडी नावावर झाल्यानंतर गाडीवर लोन करून फेडण्याचे ठरले. गाडी नावे करून देण्याचे सांगत श्रीराम फायनान्स कंपनीकडून सर्व कागदोपत्री व्यवहार अंबाजोगाई शाखेत पूर्ण ही करून घेतला परंतु गाडी मात्र सातपुते यांच्या नावावर झाली नाही. अचानक सातपुते यांच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या सिरसाळा शाखेच्या खात्यातील जवळजवळ ३५ हजार एवढी रक्कम श्रीराम फायनान्स कंपनी कडून कपात करण्यात आली असल्याचे लक्षात आल्याने गाडी नावावर झाली नसुन सुद्धा पैसे कपात कसे झाले अशी विचारणा सातपुते यांनी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. गाडी नावावर न होताच लोन कोणाच्या नावावर केले? एन ओ सी नसतांनाही कर्ज मंजूर कसे केले? कर्जाची परतफेड म्हणून खात्यातून पैसे कसे कपात केले ? गाडी वर लोन केले असेल तर अगोदर गाडी ग्राहकाच्या नावे का नाही झाली ? गाडीवर तारणकर्ज दिले असेल तर रक्कम खात्यात पडलीच नाही ? असे अनेक प्रश्न श्रीराम फायनान्स कंपनी कडून न मिळाल्याने,,, सातपुते यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे