अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..?

अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..?


अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गोरगरीब, वंचित लोकांसाठी कमी पैशात भोजन मिळावे म्हणून 'शिवभोजन थाळी योजना' सुरू केली. सदर योजना ही मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेली एक महत्वकांक्षी योजना होय. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पहिल्या तिमाहीत या योजनेसाठी तब्बल ६ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च केले. नंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. युती सरकारने सुरू केलेल्या झुणका भाकर योजनेत 1 रुपयात बेसन, भाकर हे जेवण मिळत असे त्या धर्तीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १० रुपयात 'शिवभोजन थाळी' योजना सुरू करण्यात आली. परंतु अंबाजोगाई शहरातील शिवभोजन केंद्र हे शासनाच्या लुबाडणूक करण्याचे अड्डे बनत चालल्याचे चित्र दिसत असून शहरातील शिवभोजन केंद्रांवर हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या लोकांना अगोदरच टेबलावर वाढून ठेवलेल्या थाळी समोर फोटो काढण्यापूरत बसवून त्या व्यक्तीला पाच रुपयांच्या चहाच्या बदल्यात फोटो, सही घेतल्या जात आहेत. म्हणजेच ओळखीच्या लोकांना डमी लाभार्थी बनवत ५ रुपयांचा चहा पाजून ४० रुपये शासनच अनुदान लाटल जात आहे. एका तक्रारदाराने या सर्व प्रकाराच चित्रीकरण केल्याचा दावा करत शहरातील सर्व शिवभोजन केंद्रांची एक विशेष चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी तसेच आजवर या सर्व शिवभोजन केंद्रांच ऑडिट करून त्यांच्या फोटोतील ग्राहकांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना केलेल्या तक्रारीत तक्रारकर्त्याने केली आहे. त्यामुळे 'दाल में कुछ काला है' म्हणण्याऐवजी अंबाजोगाई शहरातील शिवभोजन केंद्रांच्या थाळी मधली संपूर्ण डाळ काळी आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे