अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का?
अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का..?
आमदार नमिताताई मुंदडा यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचनामा धूळखात पडून...
अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): दिनांक १४ नोव्हेंबर रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मा. निमिता मुंदडा यांनी अचानकपणे अंबाजोगाई येथील शासकीय धान्य गोदामास भेट दिली होती. त्यावेळी गोदमातील धान्याची ६० पोती मोजली असता त्याचे वजन ४७.२०, ४७.५०, ४७.८०, ४८ कीलो ग्राम असल्याचे आढळून आले होते तसा पंचनामा ही ऍड संतोष लोमटे, शेख नूर महंमद हुसेन अमोल पवार, गौरव लामतुरे, अमोल म्हस्के, दक्षता समिती सदस्य बालाजी शेरेकर या उपस्थित पंचांच्या समक्ष करण्यात आला होता. दिनांक १४ नोव्हेंबर रोजीच संबंधित गोदाम रक्षक सुरेश बलूतकर यांना तहसीलदार विपीन पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश ही दिले होते परंतु वेळेत खुलासा सादर न केल्याने मा. तहसीलदार अंबाजोगाई यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिनांक १५ नोव्हेंबरलाच शासकीय धान्य गोदाम रक्षक यांच्या कामात कमालीचा हलगर्जीपणा दिसून आल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) व (वर्तणूक) नियम 1979 मधील तरतुदी नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे पत्र दिले होते. काही दिवस गोदाम नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड यांच्या उपस्थितीत चालू होते. काही दिवस मात्र अद्यापही शासकीय धान्य गोदाम, अंबाजोगाई येथील गोदाम रक्षक यांच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीये. मा.आ. नमिताताई मुंदडा यांच्या उपस्थितीत पंचनामा होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप पर्यंत साधं तात्पुरत निलंबन सुध्दा का करण्यात आलेल नाही ? एखाद्या आमदारांनी केलेल्या तक्रारी नंतर तात्काळ पंचनामा तर केला जातो, कार्यवाही मात्र कसलीही होत नाही. विद्यमान आमदारांच्या तक्रारीबाबत प्रशासन गंभीर नाही का ? आमदारांच्या तक्रारीची 'ही' अवस्था आहे तर सामान्यांच्या काय ? जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अंबाजोगाई च्या गोदाम रक्षकास 'क्लीन चिट' तर दिली नाही ना ? जर 'क्लीन चिट' दिली नसेल तर ते गोदामात आजही उपस्थित कसे ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
टिप्पण्या