शिक्षकासाठी विभागीय स्तरावर कथाकथन स्पर्धेचे आयोजन, अध्यक्षा कल्पनाताई हेलसकर यांचे शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन
.
शिक्षकांनी सहभागी व्हावे साने गुरुजी कथामालेचे चा उपक्रम या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान संयोजक तथा अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर यांनी केले आहे.
अहमदपूर दि.03.01.2022 पूज्य साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून आखिल भारतीय कथामाला हेलस शाखे तर्फे शिक्षकासाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा तथा संयोजिका श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर यांनी दिली.
स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर यांनी 1994 मध्ये स्थापन केलेल्या सानेगुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे विद्यार्थ्यांच्या सह शिक्षकासाठी ही अनेकविध संस्कारक्षम, शैक्षणिक ,सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात विभागीय कथाकथन स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून प्रवेश मोफत आहे.कथा मराठी भाषेत असावी. सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकासाठी स्पर्धा खुली आहे.
विजेत्यांना रोख पारितोषक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 15 जानेवारी तर विभागीय स्पर्धा 24 जानेवारी रोजी होणार असून 10 जानेवारी 2022 पर्यंत सहभाग नोंदवता येईल.
कथामालेचे जिल्हा समन्वयक औरंगाबाद सुनील साबळे ,लातूर राम तत्तापुरे, जालना आर. आर. जोशी, उस्मानाबाद उमाकांत कुलकर्णी, नांदेड डॉ. व्यंकटेश चौधरी, बीड वाय. जी. बेंबडे ,परभणी डॉ. काशिनाथ पलले वाढ, हिंगोली संगीता देशमुख तसेच helaskatha mala या ब्लॉग वर संपर्क साधावा असे जाहीर आव्हान अध्यक्षा तथा संयोजिका श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर सहसंयोजक डॉ. सुहास सदावर्ते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, जमीर शेख, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंदा जी ढाकरे यांनी केले आहे.
टिप्पण्या