फक्त आश्वासनांवर आश्वासनं,कारवाई मात्र शून्य,राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे पाचशे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर
फक्त आश्वासनांवर आश्वासनं,कारवाई मात्र शून्य,
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे पाचशे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर...
अंबाजोगाई: महाविकास आघाडी सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कडून देण्यात येणाऱ्या आश्वासनांना कंटाळून दि ११ पासून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांसह राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर जात आहेत. आजवर कोविड १९ सारख्या भीषण महामारीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून ज्या डॉक्टरांनी अहोरात्र सेवा दिली, अनेकांना जीवनदान दिले,ना वेळ पहिला ना काळ, ज्यांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिलं त्यांच्यावर कायम सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन किंवा लक्षणिक उपोषणं करावी लागतात, ही पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकवणारी घटना आहे. सेवा नियमित करण्यासंदर्भात यापूर्वीही शासनाकडून बऱ्याच वेळा आश्वाशीत करण्यात आले होते.या सर्व सहाय्यक प्राध्याकांना नोव्हेंबर 2020 मध्ये मा. ना. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांनी शासनसेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोरोना महामारीत हे आश्वासन मागे पडले, कोरोनाची दुसरी लाट ओसरेपर्यंत या डॉक्टरांनी आपले प्रथम कर्तव्य पार पाडत, रुग्णसेवा हे आद्य कर्तव्य मानत प्रथम सेवा देण्याचं ठरवत या आंदोलनाला काही काळ स्थगिती दिली.कोरोना ची दुसरी लाट ओसरल्यानंतर एप्रिल 2021 मध्ये परत एकदा शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या सहाय्यक प्राध्यापकांनी आपत्कालीन सेवा सुरू ठेवत लक्षणिक आंदोलन केले, त्यावेळी मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आठ दिवसात सेवेत सामावून घेण्याच ठाम आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. अश्या वेळोवेळी दिल्या गेलेल्या आश्वासनांकडे शासन व मंत्रीमहोदयांनी परत परत पाठ फिरवल्यामुळे आम्ही राज्यातील पाचशे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर जात असल्याचे इथे उपस्थित डॉक्टरांनी न्यूज महाराष्ट्र टुडेशी बोलतांना सांगितले.कोविड महामारीत रुग्णसेवेत सिंहाचा वाटा उचलनाऱ्या व सामान्य जनतेने अस्तित्वाअसलेला खरा परमेश्वर म्हणून स्वीकारलेल्या या डॉक्टरांना अजून किती दिवस कोरड्या आश्वासनांची खैरात वाटली जाणार? आणि पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र सरकार या कोविड योद्धयांचा सन्मान फक्त 'कोविड योद्धा सर्टिफिकेट' आणि पुष्पहार घालूनच करणार का? वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आठ दिवस कधी संपणार ? मंत्रीमहोदय आपले आश्वासन पूर्ण करणार की या फ्रंटलाईन वर्कर असलेल्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना असेच झुलवत ठेवणार ? असे प्रश्न सामान्य जनतेतून विचारले जात आहेत.
टिप्पण्या