यशवंत विद्यालयात लसीकरणपंधरा ते अठरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावे. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे आव्हान.
यशवंत विद्यालयात लसीकरण
पंधरा ते अठरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावे.
तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे आव्हान.
अहमदपूर दि.06.01. 22 सबंध देशातील शालेय विद्यार्थ्यांचे कोरोना काळात आरोग्य चांगले रहावे यासाठी शासनाच्या वतीने मोफत 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींनी या लसीकरण सोहळ्यात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
ते दि. 6 रोजी यशवंत विद्यालयात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, डॉ. प्रविण भोसले, डॉ. शुभांगी सुडे ,डॉ. राजेश्री सोळंके, व्ही व्ही गंपले पर्यवेक्षक उमाकांत नरडेँले, दिलीप गुळवे सह मान्यवर उपस्थित होते.
दहाव्या वर्गाचे अभिजीत पाटील या युवकाला लस देऊन लसीकरणाच्या सोहळ्याचा आरंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या लसीकरण सोहळ्याला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक दत्तात्रय बिराजदार यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी आभार राजकुमार पाटील यांनी मानले लसीकरण यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख शरद करकनाळे, दीपक हेंगणे, बालाजी माळी, एनसीसी विभागाच्या मधुबाला आंधळे, ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका निर्मला पारसे, एच एस कांबळे ,रेश्मा नागराळे ,रेवता ली हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले
टिप्पण्या