स्वा रा ती रुग्णालयामार्फत आमदार फंडातुन करण्यात आलेल्या खरेदीतही घोळ ? ..
आमदार फंडातून स्वा रा ती रुग्णालयामार्फत करण्यात आलेल्या खरेदीतही घोळ..?
विविध मागण्यांसाठी मनसे कडून अधिष्ठातांना निवेदन...
अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य):- अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आमदार फंडातून १०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु त्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मशीन साहित्य ज्या संख्येत घ्यायचे त्यापेक्षा कमी साहित्य घेऊन उर्वरित निधीचा अपहार करण्यात आला असून या आमदार फंड निधीतुन झालेल्या खरेदीची चौकशी करण्यात यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या बरोबरच बाहेरील खाजगी मेडिकल वरून जेनेरिक औषधांच्या नावाखाली महागडी औषध विक्री होत असून या खाजगी मेडिकल सोबतचा करार रद्द करण्यात यावा, तसेच संस्थेतील अधिक्षक व उपअधीक्षक ही मंजूर नसलेली पदे तात्काळ निरस्त करून या पदावरील व्यक्तींना मूळ पदस्थापने वर नियुक्त करण्यात यावी, स्वीय प्रपंजी खात्यातून(PLA) लेखशीर्ष बदलून देयके देण्यात आली आहेत, जे महाराष्ट्र कोषागार नियम 1968 प्रमाणे बेकायदेशीर असून या देयकांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अश्या विविध प्रकारच्या एकूण ११ मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सुनील जगताप,नितीन परदेशी,लक्षण शिंदे,यशवंत राजेभाऊ,सचिन सुरवसे,विलास शिंदे इ. च्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पण्या