महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधुता व न्यायाचा संदेश वर स्वीकारा. जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रतिपादन.

महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधुता व न्यायाचा संदेश वर स्वीकारा.
   जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रतिपादन.
 अहमदपूर / प्रतिनिधी मानव विश्वाच्या कल्याणाचा जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधूता व न्यायाचा संदेश स्वीकारून संबंध मानवी जीवन कल्याणकारी बनवा असे प्रतिपादन श्नी श्नी श्नी 1008 केदारनाथ रावल रत्न जगदगुरु भिमा शंकरलिंग शिवाचार्य महास्वामी उत्तराखंड उखी मठ यांनी केले. ते शनिवार दि. 5 रोजी नगरपरिषदेच्या आवारात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलात जगत ज्योती महात्मा बसवेश्वराच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी आशीर्वचन पर बोलताना व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबासाहेब पाटील होते.
व्यासपीठावर श्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,नगराध्यक्षा आश्वीनीताई कासनाळे,महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष गणेश हाके पाटील ,सचिव सांबप्पा महाजन ,भाजपा अंपग सेलचे प्रमुख रामदास पाटील, प.स.सभापती गगांसागर जाभाडे,शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, रिपाइंचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे,जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याकचे सिराजोद्दीन जहागीरदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे,भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस दिलिपराव देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मदे, उपसभापती बालाजी गुट्टे ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंत पाटील,भाजप तालुका अध्यक्ष हणमंत देवकत्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, जि प सदस्य बसवराज पाटील कौवळखेडकर,चाकूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, सहसचिव राजाराम वाघमारे, कोषाध्यक्ष प्रदिप वट्टमवार,नगरसेवक अभय मिरकले,पं.स.सदस्य कमलाकर पाटील, सह मान्यवर उपस्थित होते.
         यावेळी जगत गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी पुढे बोलताना म्हणाले की अध्यात्म एक अद्भुत शक्ती असल्याचे सांगून भाव तिथे देव असतो असतो आत्मिक सुखासाठी ध्यान धारणा महत्त्वाची असून मानवतेच्या एकात्मतेसाठी सुख-शांती महत्त्वाची, सत्याला त्याग करणे म्हणजे धर्म होय. वीरशैव लिंगायताची पंच पिठे असून त्याद्वारे संबंध मानवजातीच्या विश्वशांतीचा संदेश देत असल्याचे सांगितले.  
 याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष गणेश हाके, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अपंग सेलचे रामदास पाटील, नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, सभापती शिवानंद हेंगणे,बसव ब्रिगेडचे अविनाश भोसीकर आदीचे समायोचीत भाषणे झाले.यावेळी श्नी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले व अध्यक्षीय समारोप आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. प्रास्ताविक महात्मा बसेश्वर समितीचे सचिव साम बाप्पा महाजन यांनी केले यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे, रंजीत चौधरी यांनी तर आभार एडवोकेट भारत चामे यांनी मानले.या सोहळ्याचा शुभारंभ संत शिरोमणी मन्मथ माउली व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाद्यपूजन करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य सोमेश्वर कदम ,राजकुमार मजगे, नगरसेवक सर्वश्री फुजेल जाहागीरदार,डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, संदीप चौधरी ,राहुल शिवपुजे, सय्यद सरवरला ,महानंदा डावरे,अनुराधा नळेगावकर,मुन्ना सय्यद, ओमप्रकाश पुणे,शरण चंवडा,काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन,प्रा.विश्वभंर स्वामी, सुभाष शेटकार सह महिला व बसव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे