अ.भा.प्रहार न्यायमंच संचालित इ.मा.ब.कल्याण विभाग आश्रमशाळा संघटना लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.
अ.भा.प्रहार न्यायमंच संचालित इ.मा.ब.कल्याण विभाग आश्रमशाळा संघटना लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवा विषयक समस्या जिल्हा स्तरावर मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे व राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लातूर जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली.
कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष स्थानी बाळासाहेब गाडगे, उपजिल्हाध्यक्ष सत्यवान कांबळे, सचिव काशिनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष बालाजी दिगंबरराव कतुरे, कोषाध्यक्ष नर्सिंग साहेबराव देशमुख, संपर्क प्रमुख सय्यद हमीद चाँदसाब, जिल्हासंघटक ऋषीकेश बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख व्यंकट राठोड, सदस्य संजय आनंदराव चव्हाण, उमाकांत सुरवसे, शरद संपते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बाळासाहेब घाडगे यांची प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मराठा कुणबी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
लातूर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीला प्रामाणिक कार्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रहार न्यायमंच संघटनेच्या नूतन कार्यकारणीमुळे जिल्ह्यातील कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण असून न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी हक्काची संघटना असल्याचे समाधान कर्मचारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या