अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने स्वाराती रुग्णालयातील अनेक वर्षानी ठाण मांडलेल्या कर्मचार्‍यांच्या बदलीची आरोग्य प्रशासनाला मागणी

*आशिया खंडातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील अधिकारी,डाॅक्टर, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी*..


अंबाजोगाई प्रतिनिधी:- प्रसेंनजित आचार्य
आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय, महाविद्यालय ओळखण्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकारीयांची,डाॅक्टर तीन वर्षांनी तर वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांची सात वर्षांनी बदली करण्याचे शासनाचे नियम आहे
परंतु येथील रुग्णालय-महाविद्यालयातील अधिकारी,डाॅक्टरांची गेल्या सतरा वर्षांपासुन राजकिय दबावाखाली एकाच खुर्चीवर चिटकुन बसलेले आहेत
नियमानुसार बदली करण्याचे आदेश असतांना देखील बदली का करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित होतो एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष काम करीत असल्याने संबंधित अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक डाॅक्टर राकेश,एचओडी डाॅ.बगाते,एचओडी डाॅ.धपाटे,पि.एम विभागातील डाॅ.कचरे,डाॅ.धहिरे,डाॅ.चव्हाण,
मेडिसीन विभागातील एचओडी डाॅ.बिराजदार यांचा मनमानी सुरुच आहे यामागचं``अर्थकारण``असाव हे मर्जीतील अधिकारी,डाॅक्टर असल्याने त्यांचा बदली बाबतचा विचार केला जात नाही याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. परंतुअधिकारी,डाॅक्टर ,कर्मचारी राजकिय दबाव वापरुन एकाच ठिकाणी ठाणं मांडुनआहेत.त्यांना प्रशासनाकडुन पाठिशी घातले जाते प्रशासन मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागातील डाॅक्टर, अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे ठाणं मांडुन बसलेल्या अधिकारी,डाॅक्टर कर्मचारी यांना सुट न देता सर्वांच्या सरसकट बदल्या करण्यात यावेत अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे