अहमदपूर ते औरंगाबाद बस गाडी चा शुभारंभ.

अहमदपूर ते औरंगाबाद बस गाडी चा शुभारंभ

अहमदपूर दि.13
अहमदपूर येथून औरंगाबाद साठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या साठी नव्याने सूरूवात केलेल्या गाडीचा शुभारंभ युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांना दुपारच्या नंतर गाडी नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यासाठी ही गाडी सूरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबीत होती.येथील आगाराचे कर्तव्यदक्ष आगार प्रमूख सोनवणे साहेब यांनी पूढाकार घेवून नव्याने ही गाडी मंजूर करून घेतली. 
नूकतीच ही गाडी सूरू झाली असून या गाडीची रितसर पुजा करून या गाडीचा शुभारंभ युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.या गाडीमूळे अंबाजोगाई,केज,बीड,
जालना,औरंगाबाद येथे.जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे अवाहन या प्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले.

या प्रसंगी आगार प्रमूख सोनवणे साहेब,वहातूक निरिक्षक देशमुख साहेब, पत्रकार सय्यद सलीमभाई आदींसह चालक-वाहक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे