कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी ग्रा प ने नव निर्वाचीत संचालकांचा सत्कार
किनगाव ( प्रतिनिधी )
अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील कोपरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी उपसरपंच भरतराव पलमटे आणि माजी कृषी अधिकारी अशोकराव कंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद यश संपादन केले असून विद्यमान चेअरमन मदनराव पलमटे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा चारी मुंड्या चीत पराभव करण्यात आला. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे १३ च्या १३ संचालक बहुमताने विजयी झाले आहेत. परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे सर्व श्री साहेबराव गोरे, सचिन पाटिल, एकनाथ पलमटे, उत्तम बने, इंद्रजीत देपे, माधव बेद्रपे, सुभाष पलमटे, उत्तमराव सुर्यवंशी ,संतोष कंदे , बालाजी देपे , सौ सुनंदा बनसोडे , सौ मिरा पलमटे, सौ अरुणा देपे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.बी.कातळे यांनी काम पाहिले. यावेळी गट सचिव दिगंबर कांबळे उपस्थित होते
हा विजय कोपरा येथील परिवर्तनवादी शेतकरी कष्टकऱ्यांचा आहे यापुर्वी गेली कित्येक वर्ष सोसायटीच्या चेअरमन ने संचालक मंडळाला आणि शेतकऱ्यांना धोका देऊन एकहाती स्वार्थ भावनेने स्वतः कडे सत्ता ठेवली असे मत भरत पलमटे आणि अशोकराव कंदे यांनी मांडले.या विजयाबद्दल कोपरा ग्रा प च्या वतीने सरपंच गंगाधर देपे , उपसरपंच प्रा बालाजी आचार्य ,व्हा चेअरमन मधुकर सुर्यवंशी, ग्रा प सदस्य साहेब पठाण, वंदेमाला सुर्यवंशी , अशोक पलमटे, श्रीधर बनसोडे, शिवाजी पिटाळे ,अंगद गोरे, दिगंबर जाधव, विश्वनाथ आचार्य, सत्तार पठाण, सुग्रीव देपे, वामनराव पलमटे, सुभाष आचार्य,सुदर्शन पलमटे, प्रल्हाद कदम, नाथराव सुर्यवंशी, नितीन बने ,दिपक कंदे, विवेक जोशी, सुनिल कंदे, सदाशिव पिटाळे, कांचनदास आचार्य ,अप्पाराव नलवाड आदींनी नव निर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या२९७ व्या जयंती दिनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून केला आणि पुढील वाटचालीस सम्यक शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या