आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष संतोष टाक यांची सुवर्णकार यांच्या निवासस्थानी भेट.
*आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया* चे संस्थापक अध्यक्ष संतोष टाक यांची सुवर्णकार यांच्या निवासस्थानी भेट .
उदगीर प्रतिनिधी,
ध्यास सोनार समाजसेवेचा श्वास आपुलकीचा या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील सोनार समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार या बाबत मार्गदर्शन करणारे , आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष टाक यांनी बालाजी सुवर्णकार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान त्यांनी आरंभ प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करत असलेल्या शैक्षणिक सामाजिक इत्यादी कार्याची माहिती दिली व दिनांक १४ मे २०२२ रोजी नाशिक येथे होत असलेल्या सोनार समाजातील शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक , इत्यादी कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधव व भगिनींचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण संतोष टाक यांनी बालाजी सुवर्णकार यांना निमंत्रण दिले . याप्रसंगी संतोष टाक व त्यांच्या सोबत आलेले पांचाळ यांचा संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर , संत नरहरी महाराज सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर , सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर व टीचर ग्रुप ऑफ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार , माऊली सुवर्णकार , इत्यादी उपस्थित होते.
टिप्पण्या