"स्पर्ष " सेवाभावी संस्थेच्या वतीने नागझरी येथे सर्वरोग निदान शिबीर
नागझरी येथे सर्व रोग निदान शिबिर
"स्पर्श" द एम्फटिक टच सेवाभावी संस्था, नागझरी यांच्या विद्यमाने नागझरी ग्रामपंचायत येथे डॉ. अनुजा बेरलकर , एमबीबीएस,(एमडी), (मेडीसिन) यांनी आज नागझरी येथे ऋदय रोग, उच्च रक्तदाब, मधू मेह, मेंदू विकार, कावीळ, पोट विकार, मूत्र रोग, किडनी विकार, सांधे वात व इतर रोग मोफत तपासणी, मोफत शुगर तपासणी व गरजूंना मोफत औषध वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक सरपंच रामकिशन सुर्यवंशी होतें तर प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य रामचंद्र इप्पर होतें, प्रलाद इप्पर, बालाजी नागरगोजे, मारोती इप्पर , बालाजी इप्पर , व्यंकट इप्पर, ज्ञानोबा इप्पर, बाबु इप्पर इ. उपस्थित होते.
डॉ बेरलकर मॅडम यांनी व यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 70 नागरिकांचा औषध उपचार केला.
"स्पर्श" द एम्फाटीक टच सेवाभावी संस्थेचे सचिव व गावचे उपसरपंच उधव इप्पर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावचे भूमिपुत्र पिंपरी चिंचवड येथे असलेले पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात असे जन उपयोगी कार्यक्रम घेतले जातात. आतापर्यंत गावात मागील दोन वर्षात अनेक वेळा मोफत नेत्रदान शिबिर घेऊन मोफात डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे, दंत तपासणी शिबिर, सर्व रोग निदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेतलेलं आहेत.
टिप्पण्या