"यशवंत विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी."

"यशवंत विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी."
अहमदपूर दि.(02.10.22) येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
    यावेळी दोन्हीही प्रतिमांच्या फोटोला प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री व्ही व्ही गंपले म्हणाले की, तरुणांनी थोरांचे विचार आत्मसात करून आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले. या जयंतीच्या निमित्ताने भाषण, निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी उपप्राचार्य गिरिधर घोरबांड, पर्वेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, संतोष पाटील, मोहन कांबळे, योगेश बिराजदार सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचलन विजय चव्हाण यांनी तर आभार सचिन खानापुरे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे