राजूर(अहमदपूर)मध्ये भव्य दिव्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आज दिनांक : 29/10/2022 रोजी राजूर(अहमदपूर) येथे
 *बाळासाहेबांची शिवसेना*
 हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख *मा.बाळासाहेब ठाकरे साहेब*,धर्मवीर *आनंद दिघे साहेब*,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. *एकनाथ संभाजी शिंदे साहेब*,शिवसेना सचिव मा.श्री. *संजयजी मोरे साहेब*,यांच्या विचाराने प्रेरित होऊन.
आयोजक... उपजिल्हाप्रमुख गणेशजी पांचाळ, राजूर (अहमदपूर) तालुकाप्रमुख *गोपीनाथ जायभाये*,तसेच शहर प्रमुख *लक्ष्मण अलगुले* यांनी  
राजूर(अहमदपूर)मध्ये *भव्य दिव्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा प्रवेश* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे *शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण* केले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.ॲड. श्रीनिवास क्षीरसागर साहेब, प्रमुख उपस्थतीमध्ये सहसंपर्क प्रमुख मा.श्री.ब्रह्माजी केंद्रे साहेब, जिल्हाप्रमुख मा.श्री. गोपाळ माने साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा विधानसभा उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील साहेब,उदगीर विधानसभा उपजिल्हाप्रमुख विधानसभा श्री विकास जाधव साहेब, अहमदपूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख श्री गणेश पांचाळ,
तसेच, मनोज चिखले उदगीर तालुकाप्रमुख, रवी शिरुरे चाकूर तालुकाप्रमुख, विकास शिंदे शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख, बाळू जाधव चाकूर शहर प्रमुख, आदी पाहुणे उपस्थीत होते. 
यावेळी लातूर जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख मा.श्री.ॲड. क्षीरसागर साहेब यांनी शिवसैनिकांना संबंधित करतेवेळी अहमदपूर तालुक्यातील मागील काळात ज्यांनी शिवसेना संपविण्याच काम केले ते *मराठवाडा संपर्क नेत्यांच्या चाटुकार कार्यकर्ता यांनी शहरातील शिवसेनेला विकण्याचे व संपवण्याचे काम केलं आहे, आणि आत्ताच्या *राजुर शहरातील शिल्लक तथाकथीत वाघ हा तर मराठवाडा संपर्क नेत्यांचा चाटुकार आहेत.* *"येणाऱ्या राजूर नगरपरिषद मध्ये यांचा बनावटी भुखवटा काढल्याशिवाय शांत बसणार नाही "* यांनी आतापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांना गुलामा सारखी वागणूक देऊन त्यांचे खच्चीकरण केलं आहे, पुढे ते म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी अहमदपूर तालुक्यामध्ये संघटन वाढीसाठी *गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक व शहरांमध्ये गल्ली तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवून साहेबांचे संघटनात्मक हात बळकट करावे.* आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगर परिषद निवडणूका ताकतीने लढवून बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा फडकवावा व राजूर (अहमदपूर) तालुक्यासाठी व शहरासाठी विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांचे व दिघे साहेबांचे विचारांची शिवसेना जोमाने वाढवावी असे ते म्हणाले.
तसेच अहमदपुर शहरातील उपशहरप्रमुख पदाची व किनगाव येथील शहर प्रमुख पदाच्या नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये *राहुल माधव गलाले यांची उपशहरप्रमुख ( पश्चिम ) पदी,* तर *मोहन संभाजी मजरे उपशहरप्रमुख ( पुर्व ) पदी* आणि *राजु किशनराव जाधव यांची उपशहरप्रमुख (पश्चिम) पदी* व *तय्यब पठाण यांची किनगाव शहर प्रमुख पदी* नियुक्ति करण्यात आली,यावेळी शेकडो शहरातील व ग्रामीण भागातून युवा तरुणांनी बाळासाहेबांची शिवसेनाला समर्थन देऊन जाहीर प्रवेश केला, या वेळी  
 लक्ष्मण गुट्टे विभाग प्रमुख किनगाव, माजी तालुका संघटक सुधाकर जायभाये, अभिषेक भोसले,माधव रोकडे, ॲड.विनोद आर्या,विनोद मुंडे, लक्ष्मण मुंडे, संतोष मुंडे, सुलतान शेख, अमीर पठाण, रहीम तांबोळी, अन्सार तांबोळी, शाहरुख शेख, सोयब शहा, ताज अत्तार, नेहाल शेख, अजर शेख, लायक शेख, तोफिक मोमीन, अमर मोमीन, इरफान तांबोळी, नरसिंग शिंदे असंख्ये शिवसैनिक उपस्थित होते. तर
हा *मेळावा यशस्वी करण्यासाठी* सुनील देशमुख सर, कपिल नाकसाखरे,प्रवीण डांगे,नरेश चौथईवाले, संगम पाटील, दत्ताभाऊ शिंदे, सतिश जंगले,गणेश मदने,माधव स्वामी, लक्की सिंग बाबरी, सागर सिंग, ऋषभ पाटील, योगेश स्वामी, विजय आंबेकर, सुरज आलापुरे,वैभव चिंचोलकर,रोहित जाधव,ब्रम्हा सारोळे,राहुल गलाले,रोहन जाधव, अविनाश तिडोळे,किरण पवार,अक्षय कदम, आदि शिवसैनिकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला,या मेळाव्याचे सुत्रसंचालन बसवेश्वर थोटे सर यांनी केले....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे