राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा शिबिराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांशी संवाद !

राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा शिबिराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांशी संवाद !

आज शासकीय विश्रामगृह, लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या शिबिराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांशी आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी संवाद साधला. प्रसंगी समवेत माजी राज्यमंत्री तथा आमदार Sanjay Bansode जी, शहराध्यक्ष मकरंदजी सावे, शहर कार्यध्यक्ष प्रशांतजी पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष विशाल विहिरे, पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. Jayant Patil - जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या `राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा` या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. Sharad Pawar साहेब, विरोधी पक्षनेते Ajit Pawar साहेब व राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक ४, ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे शिबिर संपन्न होणार आहे.

 पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्याचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत असून शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन तेवीस वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल करणा-या पक्षाने आपल्या २३ वर्षांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू राहिली आहे. पक्षाचा वैचारिक पाया भक्कम असल्यामुळे महाराष्ट्रापुढे निर्माण झालेल्या अनेक आव्हानात्मक प्रश्नांच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय पवार साहेबांनी राज्याला योग्य दिशा दाखवली.

पक्षाच्या अंतर्गत काम करणा-या विविध संघटनांनी वेळोवेळी आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली. त्याचमुळे महाराष्ट्रातील सुजाण आणि परिवर्तनशील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ दिले. अलीकडच्या काळामध्ये भक्कम संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी त्यासाठी चांदा ते बांदा परिवार संवाद यात्रा काढून तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पक्षाचा विचार पोहोचवला. त्याचे परिणाम नंतरच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला. अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाने लक्षणीय यश मिळवले. जनतेच्या अशा पाठबळामुळेच आजवरच्या २३ वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. पवार साहेबांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्याची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरूनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले.

केंद्रातील सत्ताधा-यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणा-या या देशातील काही समाजघटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणा-या विद्यार्थ्यापासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारी ट्रोल्सच्या टोळ्या पोसून पत्रकारांपासून कलावंतांपर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे. आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करू लागले आहेत. बेरोजगारीच्या संकटाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नासंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाचा डिजिटल चेहरा अधिक प्रभावी बनवण्यात येत आहे.

पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवसांचे हे शिबिर पक्षाच्या निमंत्रित पदाधिका-यांसाठी आहे. असे प्रतिपादन यावेळी उपस्थित पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे