पोस्ट्स

अखेर स नं 4 चे अतिक्रमण कायम करण्यास मंजूरी.!सामूहिक प्रयत्नाला आले यश.!!पन्नास वर्षापासूनचा प्रश्न मार्गी..!!!

इमेज
अहमदपूर शहरातील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण अखेर आज कायम करण्यास शिक्कामोर्तब झाले असून आता लवकरच लाभार्थ्यांना सदरील जागेचा हक्काचा कबालनामा मिळणार आहे. शहरातील स.नं.4 ही शासकीय जागा असून गेल्या पन्नास वर्षापासून सदरील जागेवर नागरीकांनी रहीवासासाठी अतिक्रमण केले होते.या ठिकाणी नागरीकांना नागरी सुविधा पुरविण्यात येत होत्या मात्र जागेची मालकी नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूला पासून ते वंचित होते. या संदर्भात सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नगर पालिकेने रितसर प्रस्ताव दिला होता.राज्याच्या नगररचनाकार व मूल्यनिर्धारण विभागाच्या संचालकांनी अतिक्रमण नियमानूकूल करण्यास कांही अटी व शर्तीनूसार मंजूरी दिली होती. त्या नूसार उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक आज संपन्न झाली.मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर,उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदपूर यांनी प्रस्तावाची छाननी करून या प्रस्तावास अखेर आपली मंजूरी दिली असल्याने या भागातील गोरगरीब लोकांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.तसेच गेल्या पन्नास वर्षापासूनचा हा प्रश्न कायमपणे सुटला आहे. गेल्...

स्वा रा ती म मध्येे महिलेला चाकूचा धाक, आशिया खंडात अबाधित राहील का रुग्णालयाच नाक

इमेज
(प्रसेनजित आचार्य , अंबेजोगाई):            आशिया खंडात नाव लौकिक मिळालेले अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दिवसेंदिवस असुविधांचे व समस्यांचे माहेरघर बनत चालले असून येथील अक्षरशः सिझेरियन झालेल्या महिला रुग्णाला चाकूचा धाक दाखवत धमकवण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ज्या बद्दल सविस्तर माहिती अशी की सदरील सिझेरियन महिला रुग्ण डिलिव्हरी वॉर्ड च्या वरच्या मजल्यावर अर्थात जिथे नवजात शिशुंना उपचारासाठी ठेवण्यात येतं तिथे होती. तिथे आजूबाजूला असणारे प्रसाधन गृह कुलूप बंद असल्याने व इतर वॉर्ड मध्ये ही प्रसाधन गृह वापरण्यास त्या वॉर्डातील कर्मचारी प्रतिबंध करत असल्यामुळे दोन मजले पायऱ्या उतरून या महिला बाहेर उघड्यावर मूत्रविसर्जनास गेल्या असता त्यापैकी एका महिलेला चाकूचा धाक दाखवत धमकवण्याचा प्रसंग या महिलेवर बेतल्यामुळे सदर प्रकाराने स्वारातीम च्या नावलौकिकाच नाक कापले आहे,,, सर्जिकल इमारत चकाचक बांधून झाली परंतु आजवर ही इथे असलेली सामान्य प्रसाधन गृहे मात्र कुलुपबंदच ठेवण्यात आलीत,,,वॉर्डातील प्रसाध...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अहमदपूर येथे अभिवादन

इमेज
राजुर शहर शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले युवासेना तालुका प्रमुख रामप्रसाद अय्या यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुर येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित बाळासाहेब जाधव (मा.राज्य मंत्री) सांबतात्या महाजन (कांग्रेस जिल्हा सरचिटणीस) चंद्रकांत मद्दे (मा.जि.प.सभापती) शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, युवासेना तालुका प्रमुख रामप्रसाद अय्या, नगरसेवक संदीप चौधरी, मा. नगरसेविका कल्पनाताई रेड्डी, दत्ता पाचंगे, ॲड स्वप्नील व्हत्ते, युवासेना शहर प्रमुख लहू वाळके, उपतालुका प्रमुख तिरुपती पाटील, अनिल लामतुरे कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, संतोष रोडगे, शोशल मिडिया शहर प्रमुख महादेव महाजन माधवराव कासले, पुणे, बाळासाहेब पडिले, शैलेश माणे, ॲटो सेनेचे शिवकुमार बेद्रे विभाग प्रमुख माऊली देवकत्ते, दत्ता हेंगणे, कृष्णा रोकडे श्रीराम कदम, मनोज चामे,पद्माकर पेंढ...

पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मतदारसंघाचा विकास करणार

इमेज
 आमदार बाबासाहेब  पाटील यांचे प्रतिपादन अहमदपूर दि.14/11/21 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचा  नियोजनपूर्वक पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते दिनांक 14 रोजी न्यू शॉपिंग सेंटर येथे एक कोटी 66 लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे ,शिवसेना तालुका प्रमुख विलास पवार, नगरपरिषदेचे कार्यकारी उपाध्यक्ष अँड अमित रेड्डी, बाजार समितीचे संचालक भारत सांगवीकर,श्याम देवकते, जि.प. सदस्य माधव जाधव,न.प.चे गटनेते डॉ.फुजेल जहागिरदार, पाणीपुरवठा सभापती अनुराधा नलेगावकर, आरोग्य व स्वच्छता सभापती संदीप चौधरी, नियोजन सभापती सय्यद सय्यदलाल, नग...

कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप

इमेज
कुंटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर कुटुंबाला शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत आज अहमदपूर तालुक्यातील 5 महिलांना 20 हजार रुपयांचे धनादेश आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले.  यामध्ये पेटकर ललीता बालाजी रा. अहमदपुर, दराडे शालुबाई श्रीकांत रा. व्होटाळा, चोले संगीता अंगद रा. अहमदपुर, मोरे शांता सतिश रा. महादेववाडी व सुर्यवंशी शोभा ज्ञानोबा रा.कुमठा (बु) यांचा समावेश आहे.  याप्रसंगी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद तात्या हेंगणे, जि.प. सदस्य माधव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादीचे ता. कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे फेरोजभाई शेख, पंचायत समिती सदस्य शाम पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल.पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार- लक्ष्मण अलगुले

इमेज
मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल. ===================== पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार- लक्ष्मण अलगुले ======================       शहरामध्ये दर आठवड्याला एका वेळा नियमीत पाणी सोडणे व शहरातील पाईप लाईन मुळे व अतिवृष्टीमुळे गल्ली गल्लीत झालेले खड्डे तात्काळ दुरुस्ती करणे तसेच शहरात होणाऱ्या अस्वछतेमुळे व नाली अभावी डेंगु मलेरिया व इतर रोगराई होत असुन या गलथान कारभारावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अन्यथा नगरपरिषदे समोर तिरडी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी मुख्यअधिकारी यांना निवेदनातुन दिला आहे.       शहरवासी हे गेली ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असुन सन २०१७ साली मंजूर असलेली कायम स्वरूपी पाणी पुरवठा यो योजना आज तागायत संपुर्णताहः आमलात आलेली नसुन शहरातील जनतेला नियमीय व सुरळीत पाणी येत नसल्यामुळे शहरातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . गेले कित्येक वर्षा पासून मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्य...

इनर विल आणि न्यू शॉपिंग सेंटरच्या नवदुर्गा चा विधायक उपक्रम, आजारा पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे.डॉ .अर्चना ताई शिंदे यांचे प्रतिपादन.

इमेज
     अहमदपूर दि.10.10.21 स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगामध्ये माणसाचे जीवन स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगून निरामय जीवन जगण्यासाठी प्राणायाम, ध्यान, योग करा. बदललेल्या जीवनशैलीमध्ये पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध भूल तज्ञ डॉ. अर्चना शिंदे यांनी केले.      त्या न्यू शॉपिंग सेंटर येथे इनरव्हील क्लब आणि न्यू शॉपिंग सेंटर च्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरीर स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा भोसले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ .संगमेश्वर हेंगणे, डॉ. अमृत चिवडे, डॉ. मनकर्णा पाटील, योग मूर्ती शिवमुर्ती भातंबरे ,डॉ. रत्नमाला हिंगणे .डॉ. जीवन शिंदे. दक्षयानी महिला मंडळाच्या अध्यक्षा माहेश्वरी शेटकार सह मान्यवर उपस्थित होते.      यावेळी डॉ. अर्चना शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की जीवनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष ...