पोस्ट्स

उदयोगातुन अस्तित्व निर्माण करा - प्रा. सतिश डी कांबळे

इमेज
उदयोगातुन निर्माण करा आस्तित्व - प्रा. सतिश डी कांबळे   लातुर- उद्योजकांची ग्रेट भेट या कार्यक्रमाचे आयोजन जुना आैसा रोड येथे सुगरणीचे लोंणच चविष्ट व चटकदार बनवणाऱ्या सौ. प्रितमताई जाधव लातुरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश काळे साहेब (उदयोनिती तज्ञ) हे उपस्थित होते. तर श्री आंबेकर साहेब (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातुर) श्री. सुर्यवंशी साहेब (जिल्हा उदयोग केंद्र उस्मानाबाद) व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर येथील श्री. सतिश डी कांबळे (जिल्हा समन्वय) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री सतिश डी कांबळे म्हणाले भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर हि ग्रामीण भागातील सुसक्षित बेरोजगार युवकांना युवतींना व स्वंयसायता समुहातील महिलांना प्रशिक्षण देते तरी सुसक्षित बेरोजगारांनी आपल्या मधिल सुप्त गुणांचा शोध व पुढाकार घेऊन उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन छोटा मोठा उदयोग उभारणी करुन स्वतः चे आस्तित्व निर्माण करा आज वाढती लोकसंख्या हि बेरोजगारीचे कारण होऊन बसली आहे. य...

"स्पर्ष " सेवाभावी संस्थेच्या वतीने नागझरी येथे सर्वरोग निदान शिबीर

इमेज
नागझरी येथे सर्व रोग निदान शिबिर    "स्पर्श" द एम्फटिक टच सेवाभावी संस्था, नागझरी यांच्या विद्यमाने नागझरी ग्रामपंचायत येथे डॉ. अनुजा बेरलकर , एमबीबीएस,(एमडी), (मेडीसिन) यांनी आज नागझरी येथे ऋदय रोग, उच्च रक्तदाब, मधू मेह, मेंदू विकार, कावीळ, पोट विकार, मूत्र रोग, किडनी विकार, सांधे वात व इतर रोग मोफत तपासणी, मोफत शुगर तपासणी व गरजूंना मोफत औषध वाटप करण्यात आली.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक सरपंच रामकिशन सुर्यवंशी होतें तर प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य रामचंद्र इप्पर होतें, प्रलाद इप्पर, बालाजी नागरगोजे, मारोती इप्पर , बालाजी इप्पर , व्यंकट इप्पर, ज्ञानोबा इप्पर, बाबु इप्पर इ. उपस्थित होते.    डॉ बेरलकर मॅडम यांनी व यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 70 नागरिकांचा औषध उपचार केला.    "स्पर्श" द एम्फाटीक टच सेवाभावी संस्थेचे सचिव व गावचे उपसरपंच उधव इप्पर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावचे भूमिपुत्र पिंपरी चिंचवड येथे असलेले पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात असे जन उपयोगी कार्यक्रम घेतले जातात...

ज्ञानगंगा इंग्लीश स्कुल किनगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन

इमेज
21/09/2022 वार बुधवार रोजी ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल किनगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन केले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री फड सर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप दादा दराडे प्रमुख पाहुणे व्यंकटराव सोनवणे संजयजी साठे सर श्री शिवाजीराव दराडे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशजी पांचाळ व सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद व पालक उपस्थित होते

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थेचे पुरस्कार जाहीर.

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थेचे पुरस्कार जाहीर       मुंबई दि.12.06.2022 वीर शैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत ,साहित्यिक समाज प्रबोधन कार, समाज संघटक , समाजसेवक असलेल्या एका व्यक्तीला व यासाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेला महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने त्यांच्या जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो.      दिनांक 13 रोजी या पुरस्काराचे उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या।               प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आली आहे.       त्यात 2016-2017 चा व्यक्ती ला असलेला पुरस्कार औरंगाबादचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना तर संस्थेचा शिवा संघटना यांना, 2017 -2018 चा व्यक्तीला असलेला पुरस्कार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अभय मनोहररा...

भारतीय समाजा मध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन.

इमेज
भारतीय समाजा मध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.      आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन.      अहमदपूर दि. 0406 22 महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात जातीभेद निर्मूलन, आंतरजातीय विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन करा आणि समाजामध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी मोठे प्रयत्न केले त्यांचा आदर्श समोर ठेवून तरुणांनी श्रमाला महत्व द्यावे असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.       दि. 4 रोजी ग्रामदैवत महादेव मंदिराच्या हेमाडपंती चौकटीच्या पूजन शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर मठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, मंदिर बांधकाम समितीचे ओमप्रकाश पुणे, केदारनाथ काडवादे, विनोद हिंगणे, राजकुमार कल्याणे, रामलिंग तत्तापूरे, अनिल कासनाळे, शिवकुमार उटगे सह मान्यवरांची उपस्थिती होती.     यावेळी पुढे बोलताना आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की, आज समाजामध्ये सर्व भौतिक सुख सुविधा असतानाही साम...

कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

इमेज
कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी ग्रा प ने नव निर्वाचीत संचालकांचा सत्कार किनगाव ( प्रतिनिधी ) अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील कोपरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी उपसरपंच भरतराव पलमटे आणि माजी कृषी अधिकारी अशोकराव कंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद यश संपादन केले असून विद्यमान चेअरमन मदनराव पलमटे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा चारी मुंड्या चीत पराभव करण्यात आला. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे १३ च्या १३ संचालक बहुमताने विजयी झाले आहेत. परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे सर्व श्री साहेबराव गोरे, सचिन पाटिल, एकनाथ पलमटे, उत्तम बने, इंद्रजीत देपे, माधव बेद्रपे, सुभाष पलमटे, उत्तमराव सुर्यवंशी ,संतोष कंदे , बालाजी देपे , सौ सुनंदा बनसोडे , सौ मिरा पलमटे, सौ अरुणा देपे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.बी.कातळे यांनी काम पाहिले. यावेळी गट सचिव दिगंबर कांबळे उपस्थित होते हा विजय कोपरा येथील परिवर्तनवादी शेतकरी कष्टकऱ्...

नांदेड लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा -रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी

इमेज
*नांदेड लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा* रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी अहमदपूर/दि.20 गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा,मंजुरीच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने तालूक्याचे भूमिपूत्र केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड हे आज लातूर दौऱ्यावर होते.त्यामुळे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने आज एक शिष्टमंडळ मौजे किनगांव येथे आले होते.या वेळी ना.डाॅ.भागवत कराड यांची भेट घेवून या नवीन मार्गाच्या मंजूरीच्या संबंधाने मागणीचे निवेदन दिले आहे. हा नवीन मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे.या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे.नांदेड व लातू...