"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे"
"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे" प्रो.डॉ.वाल्मिक सरवदे सरांचा वाढदिवस...त्यानिमीत्ताने. ● प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे यांचा जन्म 1 जानेवारी 1966 रोजी, बीड जिल्हातील केज तालुक्यात, केज - कळंब या रोड वर सावळेश्वर पैठण या छोट्याश्या गावी झाला. आई-वडील एक मोठा भाऊ व बहीण असे पाच सदस्य या छोट्याश्या गावी राहायचे.त्यांचे वडील विहीर खोदण्याचे काम करायचे तर मोठा भाऊ दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते.सरवदे सर दीड वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली.सरांच्या कुटुंबाने हे सर्व दुःख पचवून परिस्थितीला झुंज देऊन मावशी सुमित्रा यांनी आईची जागा घेऊन वडील व मोठा भाऊ उत्तम यांनी त्यांचा सांभाळ करून शिकवले. असे म्हणतात संघर्षाशिवाय पर्याय नाही, या वाक्याप्रमाणे त्यांनी शाळेत शिकत असताना आपली गावची शाळा मंदिरात भरायची आणि त्या मंदिरात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना बसण्याची परवानगी सुद्धा नव्हती. पण हा सर्व अस्पृश्यतेचा त्रास सहन करत-करत सरांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्य...