प्रकाश आंबेडकर तिसरा पर्याय
महाराष्ट्रातील तिसऱ्या राजकीय स्पेसच्या नवनायकाचे नवयान! कुणाला पटो न पटो पण प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी राजकारणाला (आणि अपरिहार्यपणे अवघ्या साचेबद्धध राजकारणाला) नवं वळण दिल आहे. आतापर्यंत या प्रवाहाने आपले वेगळेपण जपत राजकारण करवयचा प्रयत्न केला, मात्र मेन्स्ट्रीम होत सत्ताधारी बनायचं असेल तर आपली वेस ओलांडावीच लागेल हे साधं सत्य बाळासाहेबांना उमगलं आहे (जे अगदी काँग्रेससह भल्या भल्या डाव्या, समाजवादी मंडळींनी नजरेआड केलं). प्रकाश आंबेडकर यांच्या या आंदोलनानंतर आता आंबेडकरी युवक, चळवळी आणि विचारवंतांना आपलं अस्तित्व आणि राजकारणाची फेरमांडणी, पुनर्विचार करावा लागेल. तो न करण्याचा पूर्ण अधिकार त्यांनां आहे, पण मग डाव्यांसारखं आपलं वैचारिक शुद्धत्व जपत बाजूलाच बसावं लागेलं. हिंदू धर्म व हिंदुत्वाचा आधार हा obc आणि हिंदू मागासवर्गीय समाज राहिला आहे, प्रस्थापित हिंदुत्ववादी पक्ष- संघटनांकडे हा वर्ग ढकलला जात आलाय. या outgoing ला थांबवून जर हिंदूंना नेतृत्व म्हणून आंबेडकर मिळत असतील, तर हाही प्रयोग व्हायला काहीच हरकत नाही. यात बाळासाहेबांची विचारसरणी, बौद्ध असणं यानं काह...